Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेस ने दिला नवज्योतसिंग सिद्धू यांना धक्का; पक्षात केला ‘हा’ मोठा बद्दल

दिल्ली – काँग्रेस पक्षाने (Congress) पंजाबमधील (Punjab) पक्षाचे नवे प्रमुख म्हणून अमरिंदर सिंग ब्रार (Amarinder Singh Brar) यांची नियुक्ती केली आहे. तर प्रताप सिंग बाजवा यांची विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) पीसीसीचे प्रमुख होते, तर चरणजीत सिंग चन्नी हे पक्षाचे राज्यात मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते.

Advertisement

पंजाब विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या आदेशानुसार नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद रिक्त होते. याच पदावर शनिवारी काँग्रेस पक्षाने PCC प्रमुखपदासाठी अमरिंदर सिंग ब्रार यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

विशेष म्हणजे पंजाब विधानसभा निवडणुकीत चरणजीत सिंग चन्नी आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा आम आदमी पक्षाकडून पराभव झाला होता. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’ला 92 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेस पक्षाला अवघ्या 18 जागांवर समाधान मानावे लागले. नवज्योतसिंग सिद्धूही त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक हरले होते .

Advertisement
Advertisement

Leave a Reply