Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लग्नासाठी मुलगी पाहताय..? आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…!

मुंबई : आचार्य चाणक्य एक हुशार व्यक्तिमत्व, कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येक जण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. त्यामुळेच त्यांना ‘कौटिल्य’ही म्हटलं जात. ‘चाणक्य नीति’तून आपल्याला दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी या नीति शास्त्रात सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांची नीति आपण आपल्या आयुष्यात लागू केली, तर त्यामुळे जीवनाची रुपरेषा बदलू शकते..

Advertisement

सध्या लोकांमध्ये सहनशीलतेचा अभाव दिसतो.. राग, चिडचिड, खर्च, तणाव नि खोटं बोलण्याची प्रवृत्ती वाढली आहे. ‘चाणक्य नीति’मध्ये सुखी, आनंदी जीवन जगण्यासाठी काही मार्ग सांगितले आहेत. लग्न ही माणसाच्या आयुष्यातील महत्वाची घटना आहे. तुम्ही लग्नासाठी मुली पाहत असताना, तिच्यात नेमके कोणते गुण असावेत, याबाबत चाणक्यांनी मार्गदर्शन केलं आहे.. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Loading...
Advertisement

या गोष्टी लक्षात ठेवा..

Advertisement
  • लग्नासाठी मुलीवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती तर होत नाही आहे ना, याची शहानिशा नक्की करा, नाहीतर अशी पत्नी तुम्हाला आयुष्यात कधीही सुख देऊ शकत नाही. ती तिच्या मनाविरुद्ध तुमच्यासोबत राहील.
  • लग्नासाठी मुलगी पाहायला जाल, तेव्हा त्या मुलीला धर्माप्रती किती प्रेम आहे, हे पाहावे. आपल्या संस्कृतीची किती माहिती आहे, याचा विचार करावा. हा गुण असणाऱ्या मुली पुढच्या पिढी उत्तम प्रकारे घडवू शकतात.
  • वडिलधाऱ्या माणसांचा आदर करणारी, तसेच काळासोबत स्वत:मध्ये बदल करणाऱ्या मुलीसोबत तुम्ही लग्न करु शकता, असे आचार्यांनी सांगितलं आहे.

रोजगारासाठी मेगा प्लान..! शंभर दिवसात ‘इतक्या’ बेरोगारांना मिळणार रोजगार; पहा, कुणी घेतलाय निर्णय..
राज्यासमोर पुन्हा एकदा मोठं संकट..! उन्हाळ्यात लागणार घामाच्या धारा..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply