नवी दिल्ली : होळीचा सण संपल्यानंतर आता उन्हाळ्याला सुरुवात झालीय.. अंगाची लाहीलाही होत असताना, दुसरीकडे डासांनी रात्रीची झोप उडवली असेल.. रुग्णालयांमध्ये कोरोनानंतर आता डेंग्यू, चिकणगुनिया, मलेरियाचे रुग्ण वाढू लागलेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जगात सर्वाधिक मृत्यू हे डास चावल्यामुळे होतात.. असे अनेक लोक आहेत, ज्यांना डास चावल्यामुळे अस्वस्थ वाटते, अंगाला खाज सुटण्यासारखी समस्या होते… डासांचा विषारी डंक एखाद्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. डासांमुळे झिका विषाणू, मलेरिया, चिकनगुनिया आणि डेंग्यूसारखे आजार होऊ शकतात.
डासांचा सामना करण्यासाठी बाजारात अनेक वस्तू उपलब्ध आहेत. मात्र, त्यावर खर्च करण्याची काहीही गरज नाही.. कारण घरातील पूर्णपणे नैसर्गिक गोष्टींचा वापर करूनही आपण डासांना पळवून लावू शकता. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
डासांवर घरगुती उपाय
कापूर – वॉशरूम, किचन किंवा कपाटात कापूर ठेवल्यास त्याचा वास डासांना घराबाहेर काढतो. खोलीच्या आत किंवा बाल्कनीच्या कोणत्याही कोपऱ्यात एखाद्या छोट्या भांड्यात कापूर ठेवा. साधारण 30 मिनिटांत कापराचा वास घरभर पसरेल नि त्यामुळे डास घरात येणारही नाहीत.
लसूण – भाज्यांमध्ये नेहमी वापरला जाणारा लसूण डासांना पिटाळण्यासाठीही कामी येतो.. त्यासाठी गरम पाण्यात लसूण उकळा. हे पाणी एका बाटलीत भरा नि घराच्या कोपऱ्यात स्प्रेद्वारे फवारणी करा. डास पळून जातील.
कॉफी – सगळ्यांच्या घरात कॉफी असते. डास सामान्यत: साचलेल्या घाण पाण्यात प्रजनन करतात. अशा साठलेल्या पाण्यात कॉफी टाकल्यास डासांचे प्रजनन रोखता येतो.
लॅव्हेंडर ऑइल – लॅव्हेंडर तेलाच्या वासाने डास पळून जातात. घराच्या परिसरात स्प्रेद्वारे लव्हेंडर तेलाची फवारणी करा. हे तेल हाता-पायांवर क्रीम म्हणून वापरू शकता. त्याचाही फायदा मिळू शकतो.
पुदीना – पुदीनाच्या वासाने डासही दूर जाऊ शकतात. यासाठी तुम्ही नेहमी तुमच्या भोवती पुदीना तेलाची कुपी ठेवू शकता. डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घराच्या बाल्कनीमध्ये पुदीनाची रोपे ठेवू शकता.
मोठी बातमी..! आजपासून ‘या’ राज्यात दुप्पट जिल्हे; एकाच वेळी 13 नवे जिल्हे आलेत अस्तित्वात..
खाद्यतेलांबाबत महत्वाची बातमी..! महागाईच्या दिवसात तेलांच्या भावात ‘हा’ मोठा बदल; जाणून घ्या..