Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

गुढीपाडव्याला सोन्याला झळाळी.. सराफ बाजारात सोनं खरेदीचा उत्साह.. आजचे बाजारभाव जाणून घ्या..!

मुंबई : आज गुढीपाडवा.. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त.. या दिवशी अनेक जण सोन्याची खरेदी करीत असतात.. गेल्या दोन वर्षांपासून सण-उत्सवावर कोरोनाचे सावट होते. मात्र, महाराष्ट्र सरकारने नुकतीच सगळ्या कोविड निर्बंधातून नागरिकांची सुटका केली. त्यामुळे सराफ बाजारात आज उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे..

Advertisement

सोन्या-चांदीच्या दरात शुक्रवारी (ता. 1) नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी फारसा बदल झालेला नव्हता.. मात्र, आज गुढीपाडव्याला सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे.. देशात 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. शुक्रवारी ही किंमत प्रति तोळा 47,650 होती, म्हणजेच 10 ग्रॅममागे 450 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याच वेळी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 52,470 रुपये आहे. काल ही किंमत 51,980 रुपये होती. वरील सोन्याचे दर सूचक आहेत. त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

Advertisement

दरम्यान, दुसरीकडे चांदीचा (silver) आजचा दर 68 हजार 807 रुपये प्रति किलो आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार पाहायला मिळत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती चांगल्याच कडाडल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यात मोठी घसरण पाहायला मिळाली. गुढीपाडव्यामुळे आज सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे.

Loading...
Advertisement

रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलापासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. सोन्यासारख्या मौल्यवान धातूच्या किमतीही वाढल्या आहेत. येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सध्या सोन्यातील गुंतवणूक वाढताना दिसत आहे. सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात तेजी आल्याचे पहायला मिळत आहे.

Advertisement

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट, सनसनाटी आरोप करणाऱ्या साक्षीदाराचा मृत्यू..!
Recipe : घरच्या घरीच बनवा हॉटेल स्टाइल कढाई पनीर.. ही घ्या एकदम सोपी रेसिपी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply