मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किमती आधीच गगनाला भिडलेल्या असताना, हे थोडे की काय म्हणून मोदी सरकारने रस्त्यावरील प्रवास आजपासून आणखी महाग केला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासासाठी आजपासून जादा पैसे मोजावे लागणार आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशातील महामार्गांवरील टोलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलीय. त्यानुसार एकेरी टोल टॅक्स 65 रुपयांनी वाढवला आहे. हे दर आजपासून, अर्थात 1 एप्रिलपासून लागू झाले आहेत.. अधिसूचनेनुसार ही वाढ 10 ते 65 रुपयांपर्यंत आहे. टक्केवारीमध्ये सांगायचे झाल्यास, 10 ते 15 टक्क्यांपर्यंत ही दरवाढ जाते. त्यामुळे तुम्ही रोज राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करीत असाल, तर तुम्हाला ते महागात पडणार आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा व दिल्लीला जोडणाऱ्या अधिकांश महामार्गावरील टोल टॅक्समध्ये कमीत कमी 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या वाहनांवर याठिकाणी 10-15 टक्क्यांनी टोल टॅक्समध्ये वाढ करण्यात आली आहे. कानपूर, अयोध्या, रायबरेली आणि सुल्तानपूर जाण्यासाठी वाहनचालकांना वाढलेल्या दरात टॅक्स द्यावा लागणर आहे. लखनऊ रायबरेली राष्ट्रीय महामार्गावर छोट्या वाहनांना 105 रुपये, तर बस-ट्रकना 360 रुपये द्यावे लागतील. शिवाय लखनऊवरुन अयोध्येला जाणाऱ्यांनाही अधिक पैसे मोजावे लागतील.
छोट्या खासगी वाहनांना 110 रुपये, तर ट्रक किंवा बससाठी 365 रुपये टोल घेतला जाईल. लखनपासून कानपूर हायवेवर नवाबगंज प्लाझा आहे. त्याठिकाणी छोट्या गाड्यांसाठी 90 रुपये, तर कमर्शिअल गाड्यांसाठी 295 रुपये टोल द्यावा लागेल. लखनऊपासून सूल्तानपूर हायवेवर छोट्या वाहनांना 95 रुपये, तर मोठ्या वाहनांना 325 रुपये द्यावे लागतील. या चार हायवे व्यतिरिक्त आणखी दोन हायवे लखनऊला जोडतात. पैकी हरदोई राष्ट्रीय महामार्गावर सध्या कोणताही टोलनाका नाही आहे, तर सीतापूरमध्ये ऑक्टोबरमध्ये बदलण्यात आलेला टोल टॅक्स आकारण्यात येत आहे.
महागाईचा भडका, 1 एप्रिलपासून सामान्यांच्या खिशाला झटका.. काय काय महागलं, वाचा..
अमेरिकेचा ‘असा’ ही यु टर्न..! आधी दिली धमकी, आता म्हणतोय दोस्ती तोडायची नाही; पहा, काय आहे प्रकार..