‘अब की बार.. महंगाई जोरदार..’ इंधन दरवाढ काही केल्या थांबेना.. पाहा आज किती रुपयांनी दर वाढले..?
नवी दिल्ली : मराठीत एक म्हण आहे, ‘रोज मरे त्याला कोण रडे…?’ गेल्या 10 दिवसांत रोज पेट्रोल नि डिझेलच्या दरांत वाढ होत असतानाही त्यावर कोणीही बोलताना दिसत नाही.. ‘अच्छे दिन’चे स्वप्न धुळीला मिळाले असून, ‘अब की बार.. महंगाई जोरदार..’ असं म्हणण्याची वेळ आलीय.. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणायला सुरुवात केलीय. गेल्या 10 दिवसांपासून इंधनाच्या दरात (Fuel Price Hike) सातत्याने वाढ होतेय. तेल कंपन्यांनी आजही (गुरुवारी) पेट्रोल व डिझेलच्या दरात लिटरमागे 80-80 पैशांनी वाढ केली. आज सकाळी 6 वाजल्यापासून ही दरवाढ लागू झाली आहे.
प्रमुख शहरांतील पेट्रोलचे दर
- दिल्ली – 101.1 रुपये
- मुंबई – 115.88 रुपये
- कोलकाता – 110.52 रुपये
- चेन्नई – 106.69 रुपये
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (ता. 29) राज्यसभेत पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढण्यामागे इंधन पुरवठ्यातील समस्या असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या की, रशिया – युक्रेनमधील युद्धामुळे जगातील सर्व देश प्रभावित झाले आहेत. त्याचाच फटका भारतालाही बसला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे..
सध्या देशातील सगळ्याच शहरांमध्ये पेट्रोलच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं दिसत आहे. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 9 वेळा वाढ करण्यात आली. 22 मार्चपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 6.20 रुपयांनी वाढ झालीय. नव्या दरवाढीनंतर 31 मार्च रोजी दिल्लीत पेट्रोल 101.1 रुपये आणि डिझेल 93.07 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे..
विराटला धक्का: तर भारताचा ‘हा’ स्टार खेळाडू; पुन्हा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी
पेपर फुटीप्रकरणी अधिकाऱ्यांसह 18 जण ताब्यात; पहा इंग्रजीच्या पेपरमध्ये काय केला घोटाळा