Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रावर घोंगावतेय नवं संकट.. राज्यातील नागरिकांचे होणार हाल…!

मुंबई : विविध मागण्यांसाठी वीज कर्मचारी संपावर गेल्याने राज्य अंधारात बुडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात राज्य सरकारला यश आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असला, तरी राज्यासमोरील संकट संपलेले नाही.. कर्मचारी कामावर परतले असले, तरी राज्यातील वीज पुरवठा विस्कळित होण्याची शक्यता आहे. नवं संकट राज्यावर घोंगावत आहे. खुद्द ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीच पुढील दोन दिवस संकटाचे असल्याचं सांगितलं आहे..

Advertisement

माध्यमाशी बोलताना ऊर्जामंत्री राऊत म्हणाले, की “मागील दोन दिवसांपासून वीज निर्मिती केंद्रांना कोळशाचा पुरवठा झालेला नाही.. त्याचे परिणाम राज्यात दिसू शकतात.. काहीही झाले, तरी महाराष्ट्र अंधारात बुडू देणार नाही. विजेच्या क्षेत्रात सर्कस करावी लागते. पुढचे 2 दिवस कठीण आहेत, पण भारनियमन होणार नाही. गरज पडल्यास ‘पॉवर एक्सचेंज’मधून वीज विकत घेऊ.”

Advertisement

“हा युद्धाचा काळ आहे. युद्धाच्या काळात सगळ्या आयुधांचा वापर केला जातो. राज्यात लोडशेडिंग होऊ देणार नाही.. हे एक युद्ध आहे. रोज दीड हजार ते अडीच हजार मेगावॅट वीज खरेदी करावी लागतेय. कधी 3 ते 8 रुपयांनी वीज खरेदी केली जाते, मागच्या वेळी 20 रुपये प्रति युनिट खर्च केला गेला. येत्या 2 दिवसांत कोळशाचं नियोजन करावं लागेल, कुठे किती कोळसा द्यायचा हे ठरवावं लागेल…” असं  ते म्हणाले.

Loading...
Advertisement

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाच्या झळा तिव्र झाल्या आहेत. पुढील चार दिवसांत राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.. त्यात वीजपुरवठा खंडीत होण्याचा धोका निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील नागरिक धास्तावले आहेत..

Advertisement

पाकिस्तानच्या राजकारणात आज महत्वाचा दिवस; ‘त्या’ मुद्द्यावर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; जाणून घ्या..
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुढीपाडवा गिफ्ट; पहा DA वाढल्याने कशी वाढ होणार पगारात

Advertisement
Advertisement

Leave a Reply