Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शाळांना उन्हाळी सुटीबाबत नव्याने आदेश, शिक्षण आयुक्तांचा महत्वपूर्ण निर्णय..

मुंबई : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळांना टाळे लागलेले होते. या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु असले, तरी या शिक्षणाला अनेक मर्यादा होत्या. परिणामी, विद्यार्थ्यांची बौद्धीक वाढच खुंटल्याचे दिसून आले.. आता कोरोनाचा कहर बऱ्यापैकी कमी झालाय.. जनजीवन पूर्ववत झालेय.. काही दिवसांपासून प्रत्यक्ष शाळा भरण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी राज्य सरकारने यंदा एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी देण्याऐवजी पूर्ण वेळ शाळा भरविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयावरुन उलटसुलट प्रतिक्रिया आल्या.. काही शिक्षक संघटनांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा नि उन्हाळ्यात शाळा सुरु ठेवण्यास मोठ्या प्रमाणात विरोध केला.

Advertisement

दरम्यान, शिक्षक संघटनांचा विरोध लक्षात घेऊन शिक्षण आयुक्त सूरज पांढरे यांनी पुन्हा एकदा नव्याने आदेश काढला.. त्यानुसार, आता कोरोनामुळे ज्या शाळांचा अभ्यासक्रम शिकवण्याचे राहिलेले आहे, अशाच शाळा एप्रिलमध्ये सुरू राहणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या शाळांना मात्र एप्रिलमध्ये सुट्टी दिली जाणार आहे.. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या शाळांनी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर सुट्टी जाहीर करावी, तसेच नवीन शैक्षणिक वर्ष ठरलेल्या वेळेनुसार, म्हणजेच 15 जूनपासून सुरू होणार असल्याचे शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केलंय..

Advertisement

दरम्यान, शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या तारखेनुसार वार्षीक परीक्षा होणार आहेत. कोरोनामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा झाल्या. मात्र, आता विद्यार्थ्यांना शाळेत जाऊनच प्रत्यक्ष परीक्षा द्यावी लागणार आहे. सध्या काही शाळांच्या वार्षिक परीक्षा सुरू झालेल्या आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बहुसंख्य शाळांच्या परीक्षा संपतील. कोणत्याही शाळेने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केलेला नसल्याचे सांगण्यात आले.

Loading...
Advertisement

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी एप्रिलमध्ये शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण झालेला असेल, तर शाळा सुरू ठेवण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांना मे ते जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उन्हाळी सुट्टीचा आनंद घेता येईल. मे महिन्यात शाळा सुरू ठेवण्याबाबत कोणत्याही सुचना नसल्याचे शिक्षण आयुक्त सूरज पांढरे यांनी स्पष्ट केले.

Advertisement

पाकिस्तानच्या राजकारणात आज महत्वाचा दिवस; ‘त्या’ मुद्द्यावर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; जाणून घ्या..
अर्र.. वाढले जगाचे टेंशन..! पहा नेमके काय चालू आहे पोलादी भिंतीच्या आत चीनमध्ये

Advertisement
Advertisement

Leave a Reply