Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Recipe : सकाळच्या नाश्त्यात बनवा काहीतरी टेस्टी.. घरीच तयार करा मसालेदार कांदा कचोरी..

मुंबई : जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात काहीतरी चविष्ट आणि मसालेदार बनवायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी कांदा कचोरीची रेसिपी घेऊन आलो आहोत. आम्ही तुम्हाला आज हॉटेल स्टाइल टेस्टी आणि कुरकुरीत कांदा कचोरी कशी बनवायची ते शिकवणार आहोत. सकाळच्या गडबडीच्या वेळी कमी वेळात तयार होणारी कांदा कचोरी नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Advertisement

साहित्य- मैदा 2 वाट्या, मीठ 1 चमचा, तूप 5 चमचे, तेल 5 चमचे, पाणी आवश्यकतेनुसार, तळण्यासाठी तेल

Advertisement

मसालासाठी : तेल 4 चमचे , हिंग 1 चमचा, बारीक केलेले अद्रक 1 चमचा, बारीक केलेली हिरवी मिरची 1 चमचा, जिरे 1 चमचा, बडीशेप 1 चमचा, बारीक केलेला कांदा 1½ कप, काळे मीठ 1/4 चमचा, काळे मिरी पावडर चिमूटभर, हळद 1 चमचा, मिरची पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ.

Loading...
Advertisement

रेसिपी
कचोरीत भरण्यासाठी मसाला तयार करण्यासाठी कढईत तेल गरम करून त्यात हिंग, अद्रक, हिरवी मिरची, जिरे आणि बडीशेप टाका. 30 सेकंद ढवळत राहा आणि नंतर कांदा, काळे मीठ, मिरपूड, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ टाका. दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर कांदा शिजू द्या. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करा.

Advertisement

त्यानंतर मैदा, मीठ, तूप आणि तेल नीट मळून घ्या आणि कुस्करून घ्या. खूप मऊ पीठ करण्यासाठी पुरेसे पाणी टाका. पीठ चांगल्या पद्धतीने मळून घ्या आणि 10 मिनिटे बाजूला ठेवा. त्यांना 10 समान लहान तुकड्यांमध्ये विभाजित करा आणि त्यांना रोल करा. आता त्यांना दाबून सपाट करा आणि त्यात कांदा टाकून केलेला मसाला भरा. नंतर पीठ बंद करा आणि गोळे तयार करा. त्यानंतर एका कढईत तेल मध्यम गरम होईपर्यंत गरम करा. भरलेल्या पिठाचे गोळे हलके दाबून चपटे करा आणि नंतर मध्यम गरम तेलात ठेवा. ते तरंगायला लागले की गॅस थोडा जास्त करा आणि सोनेरी होईपर्यंत तळा. यानंतर तुमची टेस्टी कांदा कचोरी तयार आहे. हिरव्या चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

Advertisement

टेस्टी अन् हेल्दी नाश्ता हवाय; मग, या 3 साऊथ इंडियन डिश तयार कराच; रेसिपीही आहे अगदी सोपी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply