Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. ‘या’ शहरात उष्णतेने मोडलेय 130 वर्ष जुने रेकॉर्ड; पहा, किती वाढलाय तापमानाचा पारा..

दिल्ली: मार्च महिन्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. यावेळी हवामान बदलाचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मार्च महिन्यातच मे महिन्यातील उन्हाळा जाणवत आहे. हवामान विभागानेही उन्हाळ्याबाबत नव्याने एक इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, या कडाक्याचा उन्हाळ्यापासून आणखी काही दिवस सुटका होण्याची शक्यता दिसत नाही. यावेळी मार्च महिन्यातच अशी परिस्थिती आहे तर मे, जूनमध्ये काय होणार, असा प्रश्न आहे. मार्चमध्येच उत्तर प्रदेशातील आग्रा येथील तापमानाने 130 वर्षांचा विक्रम मोडला आहे. आग्रा हे सध्या उत्तर प्रदेशातील सर्वात उष्ण शहर म्हणून नोंदले गेले आहे.

Advertisement

झाशी दुसऱ्या क्रमांकावर आणि प्रयागराज तिसऱ्या क्रमांकावर आहे. मे महिन्यात असणारी उष्णतेची लाट मार्च महिन्यातच सुरू झाली आहे. दुपारी एक वाजल्यानंतर रस्त्यांवर शांतता असते. आगामी काळात दिलासा मिळण्याची कोणतीही शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली नाही. उष्णतेच्या बाबतीत उत्तर प्रदेशातील पहिल्या 5 शहरांमध्ये आग्राचा समावेश होता, मात्र कमाल तापमानात वाढ झाल्याने ते आता पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. 1982 मध्ये मार्च महिन्यात असे तापमान होते, जे यावर्षी दिसून येत आहे. 5 वर्षांपूर्वी 29 मार्च 2017 रोजी तापमान 39.7 अंशांवर पोहोचले होते, जो विक्रमी होता, मात्र यंदा मंगळवारी सकाळी 10 वाजताच तापमान 39.9 अंशांवर पोहोचले आहे.

Advertisement

दुपारी 12 नंतर ते 41 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. सध्या कमाल तापमान सरासरीपेक्षा सहा अंशांनी तर किमान तापमान सरासरीपेक्षा पाच अंशांनी अधिक आहे. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यंदा आग्रामध्ये प्रचंड उष्णतेचे एक कारण हे आहे की, यावेळी बुंदेलखंड, राजस्थान आणि दक्षिण उत्तर प्रदेशातून वाहणारे उष्ण वारे येथील आर्द्रता वेगाने कमी करत आहेत. त्यामुळे आग्रा आणि परिसरात पारा 41 अंशांच्या पुढे गेला आहे. 30 मार्चपासून तापमानाचा पारा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याबरोबरच उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.

Loading...
Advertisement

हवामान खात्याच्या अंदाज केंद्रानुसार, या आठवड्यात तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचू शकते. दिवसाच नाही तर संध्याकाळीही उष्मा कायम राहणार असून तापमानात सरासरीपेक्षा 5 ते 7 अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मते, मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला तयार होणारे चक्रीवादळ यावेळी लवकर झाले आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सही अॅक्टिव्ह झालेला नाही, त्यामुळे थंड वारे वाहत नाहीत. मार्चमध्ये देशातील बहुतांश भागात पाऊस किंवा गडगडाटही झालेला नाही.

Advertisement

उन्हाळा देणार आणखी ताप..! हवामान विभागाने ‘या’ राज्यांतील हवामानाचा दिलाय अंदाज; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply