Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

घ्या आता.. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा दणका, पाहा आज किती रुपयांनी महागलं इंधन..?

मुंबई : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका उडाला. आता तर रोज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होतेय.. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतरही विधानसभा निवडणुकांमुळे सरकारी तेल कंपन्यांनी इंधन दरवाढ केली नव्हती. त्यामुळे तेल कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. ही नुकसान भरपाई करण्यासाठी तेल कंपन्यांनी आता रोजच पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price Hike) दरवाढीचा दणका लावला आहे. गेल्या आठवड्यापासून रोज पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत.

Advertisement

भारतीय तेल कंपन्यांनी (IOCL) आज पुन्हा एकदा ही दरवाढ केली. आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. पेट्रोलच्या दरांत 84 पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली. आजच्या दरवाढीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 84 पैसे, तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली.

Advertisement

गेल्या 7 दिवसांत तेलाच्या किमतीत झालेली ही सहावी वाढ आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्चपासून (24 मार्च वगळता) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणं सुरूच ठेवलं आहे. अशाप्रकारे सात दिवसांत पेट्रोल 4.40 रुपयांनी महागलं, तर डिझेल 4.55 रुपयांनी महागलं आहे.

Loading...
Advertisement

प्रमुख शहरांतील नवे दर (प्रति लिटर)

Advertisement
  • दिल्ली – पेट्रोल 100.21 रुपये, डिझेल 91.47 रुपये
  • मुंबई – पेट्रोल 115.04 रुपये, डिझेल 99.25 रुपये
  • चेन्नई – पेट्रोल 105.94 रुपये, डिझेल 96.00 रुपये
  • कलकत्ता – पेट्रोल 109.68 रुपये, डिझेल 94.62 रुपये

दरम्यान, आता तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी 92249 92249 या क्रमांकावर एसएमएस (SMS) पाठवून किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

Advertisement

IPL 2022: ‘तो’ मोठा विक्रम मोडण्याची इशान किशनकडे सुवर्णसंधी; जाणुन घ्या ‘त्या’ बद्दल
उन्हाळा देणार आणखी ताप..! हवामान विभागाने ‘या’ राज्यांतील हवामानाचा दिलाय अंदाज; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply