मुंबई : ‘आयपीएल’च्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आजपासून (ता. 26) सुरुवात होत आहे. यंदाच्या मोसमात एकूण 10 संघ आमने-सामने असणार आहेत. आजच्या सामन्याला अवघे तास शिल्लक राहिलेले असताना, क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. दरम्यान, ‘आयपीएल’च्या 15 व्या मोसमाचा ‘श्रीगणेशा’ होण्यास काही तास शिल्लक असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट चाहत्यांना आणखी एक ‘गूड न्यूज’ दिली आहे..
पुरुषांप्रमाणेच आता भारतात महिला आयपीएल स्पर्धा सुरु होत आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने या वृत्ताला दुजोरा दिला. पुढील वर्षी महिला आयपीएलचे आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईत झालेल्या ‘आयपीएल’ गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत 2023 पासून 6 महिला संघामध्ये आयपीएल स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, की “महिला आयपीएलला ‘एजीएम’द्वारे परवानगी मिळणे बाकी आहे. पुढील वर्षापर्यंत महिला आयपीएल सुरू होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. मात्र, यावर्षी वूमन्स टी 20 चॅलेन्ज स्पर्धेचे सामने पार पडतील.” मागील काही वर्षांपासून बीसीसीआय महिला आयपीएल भरवण्याची तयारी करीत आहे. वेस्ट विडिंज आणि पाकिस्तान बोर्डाने महिला टी 20 लीग भरण्यास सुरुवात केल्यानंतर बीसीसीआयवर दबाव निर्माण झाला होता. गांगुली म्हणाले, की महिला आयपीएलला मंजुरी मिळाली आहे. पुढील वर्षांपासून स्पर्धा सुरु होण्याची शक्यता आहे. ‘आयपीएल’ चेअरमन ब्रिजेश पटेल यांनाही या वृत्ताला दुजोरा दिला.
दरम्यान, या वर्षीपासून महिला टी-20 चॅलेंज टूर्नामेंट पुन्हा सुरु होणार आहे. ही तीन संघांची स्पर्धा 2019 मध्ये सुरू झाली, आयपीएलच्या प्ले-ऑफ सामन्यांदरम्यान खेळली गेली. गतवर्षी केवळ 4 सामन्यांची ही स्पर्धा होऊ शकली नाही. आता या मोसमाचे आयोजन मे महिन्यात प्ले-ऑफ सामन्यांच्या आसपास केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
राहा तयार..! आता ‘या’ मोठ्या कंपनीचा आयपीओ येतोय.. पहा, कंपनीने काय केलाय प्लान..?
Job : बँकिंगची तयारी करणारांसाठी गूड न्यूज.. आरबीआयमध्ये आहेत या संधी.. असा करा अर्ज