Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सर्वसामान्यांची ‘डोकेदुखी’ वाढणार.. ‘या’ औषधांच्या किंमतीत मोठी दरवाढ होणार..

मुंबई : महागाईचा भडका अजूनही कायम आहे. इंधन दरवाढीनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सोबतच आता महागाईचा आणखी एक बाॅम्ब सर्वसामान्यांवर पडणार आहे.. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर ताण आणखी वाढणार आहे.. आता जीवनावश्यक 800 औषधांच्या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे रुग्णांना थेट फटका बसणार आहे..

Advertisement

राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांच्या यादीत (NLEM) समाविष्ट असलेल्या जवळपास 800 औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या किंमती म्हणजेच अत्यावश्यक औषधांच्या यादीत 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. डायबिटीस, कॅन्सर, हायबीपी आदी आजारांवरील औषधांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. त्यानुसार, येत्या 1 एप्रिलपासून या औषधांचे दर वाढवण्यात येणार आहेत. सगळ्यांच्या घरात असणाऱ्या ‘पॅरासिटॉमोल’ या औषधाचेही दर वाढणार आहेत. सोबतच 800 प्रकारच्या औषधांचे दर वाढणार आहेत. घाऊक किंमत निर्देशांकात (WPI) झालेली तीव्र वाढ लक्षात घेऊन ही दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..

Advertisement

पेनकिलर अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरलसह इतर आवश्यक औषधांच्या किंमती वाढणार आहेत. ‘ड्रग प्राईसिंग अथॉरिटी’ने औषधांच्या या दरवाढीला मंजुरी दिली आहे. येत्या 1 एप्रिलपासून ही दरवाढ होणार असल्याची माहिती मिळाली.

Loading...
Advertisement

भारतीय बाजारपेठेत उपलब्ध सुमारे 6,000 फॉर्म्युलेशन शेड्यूल औषधे आहेत, याचा अर्थ ती किंमत नियंत्रणात आहेत किंवा त्यांची कमाल किरकोळ किंमत नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) द्वारे निश्चित केली आहे. गेल्या काही वर्षांत, कोरोनरी स्टेंट आणि गुडघा रोपण यांसारखी अनेक वैद्यकीय उपकरणेही किमती नियंत्रणाखाली आणली गेली आहेत.

Advertisement

पेट्रोल कंपन्यांना ‘इलेक्शन झटका’; तब्बल 19,000 कोटींचा बसलाय फटका..!
Recipe : घरीच तयार करा हटके शेझवान चटणी.. अशी बनवा सोप्या पद्धतीने

Advertisement
Advertisement

Leave a Reply