Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रिलायंस पेट्रोलियमवर कोसळले ‘ते’ संकट; 2008 ची पुनरावृत्ती होण्याची आहे शक्यता

मुंबई : रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine war) यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगात कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या (petrol price hike) आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील आघाडीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) पेट्रोल पंप बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी 2008 मध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर कंपनीने आपले सर्व पेट्रोल पंप बंद केले होते. असा प्रकार पुन्हा घडण्याची भीती व्यापाऱ्यांना वाटत आहे.

Advertisement

साथीच्या आजारामुळे आधीच पेट्रोल पंप चालकाची आर्थिक प्रकृती वाईट होती आणि आता पेट्रोल पंप बंद पडण्याच्या भीतीने त्यांच्या त्रासात आणखी भर पडली आहे. 2008 मध्ये देखील अशीच परिस्थिती उद्भवली होती ज्यामुळे अनेकांना पेट्रोल पंप बंद करावा लागला होता. 2008 मध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल $150 वर पोहोचली होती. यामुळे रिलायन्सने आपले 1400 पेट्रोल पंप बंद केले होते. याचे कारण रिलायन्स सरकारी तेल कंपन्यांप्रमाणे अनुदानावर तेल विकू शकत नव्हते. या कंपन्यांना किमतीपेक्षा कमी दराने तेल विकण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते. रिलायन्सने अलीकडेच डीलर्सना मिळणारा डिझेलचा पुरवठा अर्धा केला. रिलायन्सच्या एका डीलरने सांगितले की, गेल्या चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2.40 रुपयांनी वाढ झाली आहे, ही कंपनीच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. पण आमच्याकडे विकायला पेट्रोल आणि डिझेल नाही. माझे टँकर गेले सहा दिवस उभे आहेत. 4 नोव्हेंबर ते 21 मार्च दरम्यान, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 82 वरून $ 111 वर पोहोचली. एका ईमेलला उत्तर देताना, रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडच्या (Reliance BP Mobility Limited) प्रवक्त्याने सांगितले की आमच्याकडे देशात 1,458 पेट्रोल पंप आहेत.

Loading...
Advertisement

किरकोळ किमतीत वाढ झाली असली तरी डिझेलच्या किरकोळ आणि औद्योगिक किमतीत प्रतिलिटर तब्बल 24 रुपयांची तफावत आहे. या आव्हानांना न जुमानता, रिलायन्स रिटेल आपल्या ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. RBML ने सांगितले की, किमतीत प्रचंड वाढ होण्याच्या अपेक्षेने डीलर्स आणि बिझनेस टू बिझनेस (B2B) आणि बिझनेस टू कस्टमर (B2C) कंपन्या मोठ्या प्रमाणात तेल उचलत आहेत. त्यामुळे मागणीतही अचानक वाढ झाली आहे. रिलायन्स जिओ-बीपी या ब्रँड नावाने देशभरात पेट्रोल पंप चालवते. हा BP-Reliance BP Mobility Limited (RBML) चा भाग आहे. 2020 मध्ये त्याची स्थापना झाली. बीपीने त्यातील 49% हिस्सा 7,000 कोटी रुपयांना विकत घेतला होता. सध्या देशभरात 1400 पेट्रोल पंप आहेत पण ही संख्या 5,500 च्या पुढे नेण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी कंपनीने तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply