Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दिल्लीत उन्हामुळे हाहाकार..! तापमानाबाबत हवामान विभागाने दिलाय ‘हा’ इशारा; जाणून घ्या..

दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. येथे उष्णता इतकी वाढली आहे, की मार्च महिन्यातच या उष्णतेने लोकांना घरातच राहणे भाग पडले आहे. दुपारपर्यंत रस्त्यांवर संचार बंदीसारखी परिस्थिती दिसू लागते. त्याच बरोबर दिल्लीत सध्या विक्रमी उष्णता जाणवत आहे. काल गुरुवारी, हवामान खात्याने दिल्लीत 35.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले.

Advertisement

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, राजधानी दिल्लीत पुढील तीन दिवस तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. त्याचवेळी 29 मार्चपर्यंत तापमान 38 अंशांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञ (भारतीय हवामान विभाग) असेही म्हणतात की 29 आणि 30 मार्चपर्यंत तापमान 40 अंशांच्या जवळ पोहोचण्याची शक्यता आहे.

Advertisement

26 मार्चपर्यंत तापमानात कोणताही चढ-उतार होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, 27 मार्चनंतर पुन्हा एकदा तापमानात वाढ होणार आहे. 27 मार्चनंतर पुन्हा तापमान 37 ते 38 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानही 20 अंशांच्या आसपास राहील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होणार आहे. पारा 39 किंवा 40 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Loading...
Advertisement

या उन्हाळ्याचा त्रास अनेक राज्यांना होत आहे. राजस्थानमध्ये तर अनेक जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटा येत आहेत. त्यामुळे येथील परिस्थिती भीषण बनली आहे. मध्य प्रदेशात सुद्धा कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. या व्यतिरिक्त उत्तर भारतातील अनेक राज्यात उष्णता प्रचंड वाढली आहे. मार्चमध्येच मे महिन्यातील भीषण उन्हाळा जाणवत आहे. एप्रिल महिन्यात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Advertisement

देशात वाढलाय उन्हाळा पण, कारण ठरतोय पाकिस्तान.. पहा, वाढत्या उन्हाळ्याचे काय आहे पाकिस्तान कनेक्शन..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply