Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नाश्त्यासाठी तयार करा टेस्टी ब्रेड उपमा.. अगदी काही मिनिटात होईल तयार; ही घ्या सोपी रेसिपी..

पुणे : नाश्ता बनवायला उशीर होत असेल तर अगदी कमी वेळात तयार ब्रेड उपमा (Bread Upma) हा उत्तम पर्याय आहे. अनेकवेळा असे घडते की, सकाळच्या गडबडीच्या वेळेत नाश्ता (Breakfast) तयार करायला वेळ मिळत नाही. अशा वेळी डोक्यात एकच विचार असतो की असा नाश्ता केला तर जो कमी वेळात बनवता येतो आणि स्वादिष्टही होतो. आपणही बऱ्याचदा हा अनुभव घेतला असेल. अशा वेळी कमी वेळात तयार होणार ब्रेड उपमा हा बेस्ट पर्याय ठरू शकतो. ब्रेडपासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवता येत असले, तरी ब्रेड उपमाची त्यातही वेगळा ठरतो. तसेच स्वादिष्टही आहे. आज आम्ही तुम्हाला कमी वेळात ब्रेड उपमा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

Advertisement

साहित्य- ब्रेड तुकडे 8, बारीक केलेला कांदा 1, बारीक केलेले टोमॅटो 2, भाजलेले शेंगदाणे अर्धा कप, हळद अर्धा चमचा, मोहरी 1 चमचा, बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या 2, हिंग चिमूटभर, लिंबाचा रस 1 चमचा, कढीपत्ता 6-7 पाने, बारीक केलेली कोथिंबीर 1 चमा, तेल आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार.

Advertisement

रेसिपी
ब्रेड उपमा बनवण्यासाठी प्रथम ब्रेड घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा आणि एका भांड्यात ठेवा. आता कढई घेऊन त्यात तेल टाकून मंद आचेवर गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिंग टाका आणि थंड करा. यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि शेंगदाणे टाकून परतून घ्या. या दरम्यान गॅसची मध्यम करावा. सुमारे 2 मिनिटे तळून घ्या.

Loading...
Advertisement

कांद्याचा रंग सोनेरी झाल्यावर त्यात टोमॅटो, हळद, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व चांगले मिसळून घ्या. हे मिश्रण साधारण 2 मिनिटे गॅसवर शिजू द्या. यानंतर ब्रेडचे तुकडे पॅनमध्ये ठेवा. त्यानंतर वर थोडे पाणी शिंपडा. यानंतर मिश्रण आणि ब्रेड चांगले मिसळून घ्या. 2 मिनिटे तळून घेतल्यानंतर गॅस बंद करा. नाश्त्यासाठी स्वादिष्ट ब्रेड उपमा तयार आहे. कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व्ह करा.

Advertisement

Sunday Recipe : मुलांसाठी बनवा बटाट्यापासून खास हटके चविष्ट नाश्ता..

Advertisement
Advertisement

Leave a Reply