Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मराठी भाषेसाठी ठाकरे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, ‘या’ ठिकाणी आता मराठी अनिवार्य..

मुंबई : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयातील कामकाज मराठी भाषेत चालावे, असा कायदा आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याचेच दिसते. याबाबत अनेकांनी तक्रारीही केल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेत, ठाकरे सरकारने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लवकरच मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील विधेयक आज (गुरुवारी) विधानसभेत मांडले जाणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य प्राधिकरणांच्या कामकाजात आणि जनसंवाद वाढविण्यासाठी या विधेयकाचा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

‘महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण (राजभाषा) विधेयक २०२२’ असे या विधेयकाचे नाव आहे. या विधेयकाबाबत बुधवारी (ता. 23) मंत्रीमंडळाच्या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. या विधेयकानुसार, यापुढे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांत मराठी भाषा बोलणारे अधिकारीच नेमण्याची सूचना केली जाणार आहे. तसेच जिल्हा मराठी भाषा समितीची अंमलबजावणी करण्याची सूचनाही या विधेयकाद्वारे केली जाणार आहे.

Advertisement

मुख्य म्हणजे, या विधेयकातील तरतुदींची अंमलबजावणी न झाल्यास, संबंधितांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद या विधेयकात आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, औद्यगिक नगरी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, अन्य स्वराज्य संस्था, नियोजन प्राधिकरण, वैधानिक महामंडळे, शासकीय कंपन्या आदींसाठी हे विधेयक लागू असेल.

Loading...
Advertisement

विधेयकाच्या अधिनियम व त्यातील तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व कार्यालयांना निर्देश देऊ शकतील. या विधेयकामुळे राज्याच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रोत्साहनपर बक्षिसांची तरतूद केलेली नाही. विधेयकामुळे राज्यातील स्थानिकांना त्यांच्या भाषेत माहिती मिळणार असून, मराठी भाषेचा वापर न केल्याच्या तक्रारींची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

फक्त एकाच रिचार्जमध्ये 5 लोक टेन्शन फ्री; टेलिकॉम कंपन्यांचे ‘हे’ आहेत बेस्ट फॅमिली पोस्टपेड प्लान..
अर्र..रोहित शर्माला ICC ने दिला धक्का; रोहीतचा झाला मोठा नुकसान

Advertisement
Advertisement

Leave a Reply