Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, यंदाच्या पावसाबाबतचा अंदाज आला समोर…!

मुंबई : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदाच्या वर्षी पाऊसमान कसे असणार, याबाबतचा अंदाज समोर येत असून, त्यात सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत. सध्या कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, शेतकरी रब्बीतील पिके काढण्याच्या कामात व्यस्त आहेत. काही ठिकाणी नांगरणीला सुरुवात झालेली असली, तरी शेतकऱ्यांचे लक्ष आगामी माॅन्सुनकडे लागलेले आहे. अशातच समस्त शेतकऱ्यांसाठी खूशखबर आली आहे…

Advertisement

यंदाच्या वर्षी पाऊसमान चांगलं राहणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट नि सप्टेंबर या चारही पावसाळी महिन्यांत दमदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.. आपल्या अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध  असलेल्या ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे.. यंदा पर्जन्यमान चांगला राहणार असून, दुष्काळ पडणार नसल्याचं भाकित वर्तवण्यात आलंय. अर्थात भारतीय हवामान खात्याकडूने अद्याप आगामी पावसाबाबत कोणतंही भाकीत वर्तवलेलं नाही, पण पुढील महिन्याच्या सुरुवातीला भारतीय हवामान खात्याचाही अंदाज समोर येऊ शकतात. यंदा माॅन्सूनपूर्व पावसाची साथ मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने यावर्षी भारतात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ऑस्ट्रेलियाचं हवामान खातं हे त्यांच्या अचूक अंदाजासाठी ओळखले जाते. भारतात काही ठिकाणी मे महिन्याच्या सुरुवातीला पेरणीला सुरुवात केली जाते. माॅन्सुनपूर्व काळात चांगला पाऊस झाल्यास, शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. शिवाय, शेतीच्या मशागतीची कामेही करण्यासाठी चांगली मदत होईल. शिवाय पाण्यासाठी लागणारा खर्चही वाचेल.

Loading...
Advertisement

योग्य वेळी पेरणी झाली तर चांगले पीकं उगवण्याची आणि त्यापासून चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता वाढते. जर खरंच तसं झालं तर शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल. अनेक भागात सध्या शेतकरी त्यांच्या शेतीला पेरणीसाठी तयार करत आहेत. दरम्यान, मान्सून यावर्षी धोका देणार नाही, अशी वैज्ञानिकांनादेखील आशा आहे.

Advertisement

अचानक आले असतील पाहुणे तर झटपट बनवा हा स्वादिष्ट पदार्थ.. अगदी सोपी आहे Recipe
बाब्बो.. 100 रुपयांच्या पेट्रोलमध्ये आपण देतोय ‘इतका’ कर; पहा, तेलाने ‘कशी’ होतेय सरकारची चांदी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply