मुंबई : रशिया-युक्रेनमधील युद्ध लांबल्याने जागतिक भांडवली बाजारावर त्याचे विपरित परिणाम पाहायला मिळत आहेत. शेअर बाजारात अनिश्चततेचे वातावरण आहे.. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (21) शेअर बाजारात घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर मंगळवारी (ता. 22) शेअर बाजार काहीसा सावरल्याचं चित्र दिसलं. त्यानंतर आजही (ता. 23) शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सकारात्मक संकेत दिसून आले.
जागतिक पातळीवरील शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे. आज सकाळी सेन्सेक्स 200 अंकांनी वधारत सुरू झाला. निफ्टीदेखील जवळपास 90 अंकांनी वधारत सुरू झाला. सेन्सेक्स 58,198 अंकांवर सुरू झाला. निफ्टीदेखील 17405 अंकांवर उघडला. प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 209.34 अंकांनी म्हणजे 0.36 अंकांनी वधारला. तर, निफ्टी 89.50 अंकांच्या तेजीनंतर 17405 अंकांवर व्यवहार करीत आहे.
दरम्यान, मंगळवारी (ता.22) शेअर बाजार बंद होताना, सेन्सेक्स 696 अंकांनी, तर निफ्टीही 197 अंकानी वधारला होता. सेन्सेक्समध्ये 1.22 टक्क्यांची वाढ होऊन तो 57,989 अंकावर बंद झाला, तर निफ्टीमध्ये 1.16 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,315 अंकांवर बंद झाला. टेक महिंद्रा, बीपीसीएल, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रिज आणि आयओसी कंपन्यांच्या निफ्टी शेअर दरात मोठी वाढ झाली. त्याच वेळी एचयूएल, नेस्ले इंडिया, ब्रिटानिया इंडस्ट्रिज, सिपला, डिवीस लॅब या कंपन्यांच्या निफ्टी शेअर दरात घसरण झाल्याचे दिसून आले..
युरोपियन बाजार सकारात्मकतेने उघडल्याने देशांतर्गत बाजारानेही मंगळवारी (ता. 22) नंतर चांगली रिकव्हरी केल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. युक्रेनच्या शांततेच्या पुढाकाराच्या संकेतांनी पुन्हा एकदा बाजारपेठेत सकारात्मक वातावरण दिसले.
‘त्यांच्या’ सांगण्यावरून झाले फोन टॅपिंग..! पहा नेमके काय समोर येतेय पोलीस चौकशीत
मागील 24 तासात देशात सापडलेत ‘इतके’ कोरोनाचे रुग्ण; जाणून घ्या, Corona Update..
अर्रर्र.. पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ.. पाहा आज किती पैशांनी झालीय वाढ…?