Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

धोनीनंतर ‘हा’ खेळाडू होणार ‘सीएसके’चा कॅप्टन, सुरेश रैनाने सांगितले ‘हे’ नाव..!

मुंबई : ‘आयपीएल-2022’चे बिगुल वाजण्यास आता मोजकेच दिवस उरले आहेत. येत्या 26 मार्चपासून क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढतीने या स्पर्धेला सुरूवात होईल. गेल्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नईने विजेतेपद पटकावलं होतं. धोनीसाठी यंदाची ही स्पर्धा अखेरची असण्याची शक्यता आहे. कारण, धोनी आता 40 वर्षांचा झालाय. त्यामुळे यंदा विजेतेपद मिळवून त्याला निरोप देण्याचा ‘सीएसके’च्या खेळाडूंचा निर्धार असेल..

Advertisement

दरम्यान, ‘आयपीएल’ सुरु झाल्यापासून धोनीच ‘सीएसके’चा कॅप्टन राहिलाय.. चेन्नईने कधीही धोनीशिवाय अन्य नावांचा विचार केला नाही, मात्र आता त्यांना हा विचार करावा लागणार आहे. धोनीनंतर ‘सीएसके’चा कॅप्टन कोण होणार? असा प्रश्न आतापासून विचारला जात आहे. या प्रश्नाचे उत्तर ‘सीएसके’कडून 2008 पासून खेळणाऱ्या ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना यानं दिलं..

Advertisement

‘आयपीएल-2022’चे ब्रॉडकास्टर ‘स्टार स्पोर्ट्स’तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रैना म्हणाला, की ‘सीएसके’कडं रविंद्र जडेजा, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा व ड्वेन ब्राव्हो असे दिग्गज खेळाडू आहेत. त्यांच्यापैकी कोणीही धोनीचा उत्तराधिकारी होऊ शकताे. कारण, या सर्वांची खेळाची समज नि क्षमता चांगली आहे. पण, माझ्या मते जडेजा या सर्वांत आघाडीवर आहे.’

Loading...
Advertisement

‘आयपीएल-2022’ पूर्वी चेन्नईने 4 खेळाडूंना रिटेन केले होते. त्यात टीम इंडियाचा ऑल राऊंडर जाडेजाचं नाव पहिल्या क्रमांकावर होते. जाडेजाला चेन्नईने 16 कोटी, तर धोनीला 12 कोटींमध्ये रिटेन केले. धोनीनं स्वत: जडेजासाठी पहिला क्रमांक सोडला. त्यानंतर जाडेजाच ‘सीएसके’चा भावी कॅप्टन असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. अर्थात, याबाबत ‘सीएसके’च्या मॅनेजमेंटने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Advertisement

अर्रर्र.. पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ.. पाहा आज किती पैशांनी झालीय वाढ…?
Weight Loss : काही जणांच्या पोटाची चरबी अचानक का वाढते.. कारणे घ्या जाणून

Advertisement
Advertisement

Leave a Reply