Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्रर्र.. पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ.. पाहा आज किती पैशांनी झालीय वाढ…?

मुंबई : देशातील पाच राज्यातील निवडणुका संपल्यावर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार असल्याची बोलले जात होते. त्याची प्रचिती येताना दिसत आहे. इंधन दरात आज (बुधवारी) सलग दुसऱ्या दिवशीही वाढ झाली. पेट्रोल 84 पैसे, तर डिझेल 83 पैशांनी महागले आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात हे नवे दर लागू झाले आहेत. याआधी मंगळवारीही (ता. 22) पेट्रोलच्या दरात लिटरमागे 84 पैसे, तर डिझेलच्या दरात 83 पैशांची वाढ करण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्याआधी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.

Advertisement

युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 114 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या आहेत. मात्र, त्याच वेळी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणूका सुरु होत्या. त्यामुळे मोदी सरकारने ही दरवाढ रोखून धरली होती. मात्र, विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच, मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता खरी ठरली आहे.

Advertisement

आता लवकर कोणत्याही निवडणुका नसल्याने आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात आज सकाळपासून पेट्रोल 84 पैसे, तर डिझेल 83 पैसे प्रति लिटरने वाढले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या पेट्रोल 110.82 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 95.00 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 114 डॉलर प्रति बॅरेलवर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येते. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ झालीय.

Loading...
Advertisement

दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने महागाई आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कारण, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. युक्रेन-रशिया युद्ध लांबण्याच्या संकेतामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. युरोपीयन संघातील काही देश रशियावरील तेलावर निर्बंध आणण्याची शक्यता असल्याने तेलाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे.

Advertisement

Weight Loss : काही जणांच्या पोटाची चरबी अचानक का वाढते.. कारणे घ्या जाणून
टोलनाक्यांबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांचा होणार फायदा…!

Advertisement
Advertisement

Leave a Reply