Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळ्याचे चटके..! एकाच झटक्यात ‘तिथे’ हजारो हेक्टर जंगल खाक; पहा, कोणत्या संकटाने दिला फटका..

दिल्ली : वाढत्या उष्णतेचा परिणाम आता जाणवत आहे. छत्तीसगडमधील सुरगुजा आणि उदयपूरच्या जंगलात भीषण आग लागली आहे. जंगलातील काही भागात वणवा आटोक्यात आला असली तरी आग वेगाने वाढत आहे. तर दुसरीकडे वनविभागाचे कर्मचारीही आपल्या 12 मागण्यांसाठी संपावर असल्याने विभागाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

Advertisement

छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील उदयपूर वनपरिक्षेत्रातील अनेक गावांमध्ये या आगीमुळे खळबळ उडाली आहे. घाटबारा, चाकेरी, सोन तराई, बसेनसह बहुतांश गावांमध्ये ही आग पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत हजारो हेक्टर जंगल नष्ट झाले आहे. त्याचबरोबर अनेक भागात नागरिकांच्या मदतीने वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. वनकर्मचाऱ्यांच्या संपामुळे आग आटोक्यात आणणे थोडे कठीण होत असले तरी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि चौकीदार सतत लक्ष ठेऊन असतात, असे वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. वणवा आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांचीही मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

सध्या देशभरात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. मार्च महिन्यात मे सारखा उन्हाळा पडला आहे. हवामानातील बदलांचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. या उन्हाळ्यामुळे लोकांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. तर दुसरीकडे तापमान वाढल्याने जंगलात वणवा पेटण्याचा धोका वाढला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच या घटनेचा अनुभव छत्तीसगड मध्ये आला आहे.

Loading...
Advertisement

या वणव्यामुळे हजारो हेक्टरवरील जंगल मात्र काही वेळातच नष्ट झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अशा घटना घडत असतात, याचा अनुभव वनविभागाला आहे. त्यामुळे या घटना घडू नयेत, यासाठी उन्हाळा सुरू होण्याआधीच वनविभागाकडून उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

देशात वाढलाय उन्हाळा पण, कारण ठरतोय पाकिस्तान.. पहा, वाढत्या उन्हाळ्याचे काय आहे पाकिस्तान कनेक्शन..?

Advertisement

भारताने ठणकावले; ‘त्या’ जागतिक समस्येला चीन, युरोप व अमेरिकाच जबाबदार..!

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply