Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टोलनाक्यांबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांचा होणार फायदा…!

नवी दिल्ली : आगामी काळात महामार्गावरचा प्रवास आणखी सुखकर नि स्वस्त होणार आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकार योजना आखली असून, त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महामार्गावरील टोलबाबत केंद्र सरकारने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, सरकार आता ठराविक अंतराच्या मर्यादेत एकदाच टोल वसूल करणार आहे. शिवाय टोलजवळ राहणाऱ्या नागरिकांनाही टोलमधून दिलासा देण्यात आला आहे.

Advertisement

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता. 22) लोकसभेत केंद्र सरकारच्या योजनेची माहिती दिली. ते म्हणाले, की आता महामार्गावरील टोलनाक्यांची संख्या मर्यादित केली जाणार आहे.. सरकार येत्या 3 महिन्यांत देशातील टोलनाक्‍यांची संख्या कमी करणार असून, आता 60 किलोमीटरच्या परिघात फक्त एकच टोल प्लाझा कार्यरत असेल. इतर टोलनाके येत्या 3 महिन्यांत बंद केले जातील.”

Advertisement

दरम्यान, टोलनाक्यांजवळ राहणाऱ्या नागरिकांची नेहमीच मागणी असते, की त्यांना टोलमध्ये सवलत द्यावी. कारण, स्थानिक असल्यानं त्यांना सतत प्रवास करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, की टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या नागरिकांना आता टोल भरावा लागणार नाही. त्यांना पास दिला जाईल. त्यामुळे स्थानिकांना आता टोल भरण्याची गरज पडणार नाही. सरकारची ही योजना येत्या 3 महिन्यांत लागू होणार आहे.”

Loading...
Advertisement

“भारतातील पायाभूत सुविधा, रस्ते 2024 च्या अखेरपर्यंत अमेरिकेच्या तोडीचे असतील, अशी मी खात्री देतो. दिल्लीहून मेरठ 40 मिनिटांच्या अंतरावर आहे. मेरठचे लोक कॅनॉट प्लेससला जाऊन आयस्क्रीम खातात नि पुन्हा घरी परत येतात. त्याचप्रमाणे येत्या डिसेंबरपर्यंत अनेक शहरे दिल्लीपासून केवळ दोन तासांच्या अंतरावर असतील. एवढेच नव्हे, तर श्रीनगर ते मुंबईचा प्रवास केवळ 20 तासांचा असेल..,” असेही गडकरी यांनी स्पष्ट केले..

Advertisement

Weight Loss : काही जणांच्या पोटाची चरबी अचानक का वाढते.. कारणे घ्या जाणून
‘त्यांच्या’ सांगण्यावरून झाले फोन टॅपिंग..! पहा नेमके काय समोर येतेय पोलीस चौकशीत

Advertisement
Advertisement

Leave a Reply