पुणे : सध्या आपला मोबाईल कितपत सुरक्षित आहे आणि आपली ऑनलाईन पद्धतीने आर्थिक किंवा इतर पद्धतीची फसवणूक तर होणार नाही ना? अशीच भीती सामान्य व्यक्तींना असते. अशावेळी इस्त्राईली पेगासस नावाची भानगड देशात घडूनही केंद्र सरकार नेहमीप्रमाणे शांत आहे. महाराष्ट्र राज्यातही असा तंत्रज्ञानाचा वापर मागील पाच वर्षात झाल्याची चर्चा आहे. सरकारी यंत्रणा आणि सत्तेमधील पक्ष अशा पद्धतीने सगळीकडे वॉच ठेवत असल्याची चर्चा असतानाच पुणे पोलिसांचे फोन टॅपिंग (Pune Police Phone Taping) समोर आलेले आहे. त्याची चौकशी जोरात सुरू आहे.
याबाबत दिलेल्या बातमीत ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्राने म्हटले आहे की, ‘फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांची पुणे पोलिसांनी सोमवारी दिवसभर चौकशी केली. चौकशीत रश्मी शुक्ला (Rashmi Shulka) यांच्या तोंडी आदेशावरून अधिकाऱ्यांनी फोन टॅपिंग केल्याचे सूत्रांनी सांगितले. आत्तापर्यंत सहा ते सात जणांची पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केली असून, त्यामध्ये पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यापासून ते तांत्रिक विश्लेषण विभागात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.’ एकूणच यामुळे हे प्रकरण खूपच मोठे असल्याचे स्पष्ट होत आहे.
- Russia-Ukraine War : अमेरिकेने रशिया विरोधात केलीय ‘ही’ मोठी कारवाई; पहा, अमेरिकेने नेमके काय केले..?
- Petrol-diesel price: व्हा तय्यार.. म्हणून पेट्रोल होणार आहे 105 रुपये लिटर..!
- गडकरींनी सांगितलाय फॉर्म्यूला..! वाहन चालवण्याचा खर्च फक्त 10 रुपये; पहा, कसा घडणार ‘हा’ चमत्कार..
दरम्यान, तांत्रिक विश्लेषण हा विभाग गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली येतो. चौकशी करण्यात आलेले पोलिस अधिकारी डहाणे शुक्ला यांच्या कार्यकाळात गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्या कालावधीत हे सर्व फोन टॅपिंगचे प्रकार झाल्यामुळे त्यांचीदेखील सोमवारी पोलिसांनी चौकशी केली. तसेच यापूर्वी तांत्रिक विश्लेषण विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून, त्यांचे जबाब नोंदवण्यात आले असल्याचे समजते. त्यांनी हे फोन टॅपिंग कुणाच्या सांगण्यावरून केले, त्यांना कुणाचे आदेश होते, कशा प्रकारे फोन टॅप केले, याबाबतची माहिती तपास अधिकारी घेत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole), माजी खासदार संजय काकडे (MP Sanjay Kakade), माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshamukh) आणि मंत्री बच्चू कडू (Minister Bachhu Kadu) यांचे वेगवेगळ्या नावाने साठ दिवस फोन टॅपिंग केल्याच्या आरोपावरून शुक्ला यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.