Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युक्रेनबाबत अमेरिकेला मिळालाय ‘हा’ इशारा.. युक्रेनच्या मदतीसाठी अमेरिकन खासदारांनी केलेय आवाहन..

दिल्ली : युक्रेनला मानवतावादी मदत देण्यासाठी भारत, इजिप्त, युएई सारख्या देशांबरोबर संपर्क साधावा, असे आवाहन 20 प्रख्यात अमेरिकन खासदारांच्या गटाने मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) यांच्याकडे केले. युक्रेनमध्ये (Ukraine) शक्य असेल तेथे मदत करण्याची नैतिक जबाबदारी अमेरिकेची (America) आहे, असे खासदारांनी बायडेन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ते म्हणाले, की आंतरराष्ट्रीय मानवतावादी मदत केल्याने युक्रेनमधील लोकांची उपासमार करण्याच्या रशियन उद्दिष्टाचा प्रतिकार करता येईल.

Advertisement

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने इशारा दिला आहे, की युक्रेनच्या राजधानी कीव शहरात थोड्याच दिवसात अन्न आणि पाण्याची कमतरता जाणवणार आहे. त्यामुळे या संकटाचा धोका पाहता अमेरिकन खासदारांनी बायडेन यांना आवाहन केले आहे. डेमोक्रॅटिक खासदारांच्या नेतृत्वातील खासदारांनी लिहिले, की युक्रेनमधील मदत वितरणासाठी मानवतावादी कॉरिडॉरची हमी देण्यासाठी रशिया (Russia) आणि युक्रेनमधील आधीचे करार अयशस्वी झाले आहेत. रशियन आक्रमण सुरूच आहे, विशेषतः रस्ते नष्ट करणे आणि वाहतूक मार्ग उध्वस्त करणे, अशा कारवाया रशिया करत असल्याचे या खासदारांनी म्हटले आहे.

Advertisement

याशिवाय युक्रेनची राजधानी कीवमध्ये काही दिवसांत अन्न आणि पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे अमेरिकेने आता युक्रेनला तत्काळ मानवतावादी मदत देण्याचा विचार केला पाहिजे. रशियाला एकतर मानवतावादी मदतीचे समर्थन करण्यास सहमती द्यावी लागेल किंवा युद्धग्रस्त देशात अन्न आणि पाणी वाहून नेणारी विमाने खाली पाडण्याची धमकी देईल, असे घडले तर जागतिक पातळीवर रशियाला आणखी एकटे पाडता येईल, असे म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर भारत (India) आणि चीनने (China) जे धोरण स्वीकारले आहे त्यामुळे अमेरिका चांगलाच अस्वस्थ झाला आहे. युक्रेनमध्ये रशिया जे काही करत आहे त्याचा चीनने स्पष्ट निषेध न करणे हे संयुक्त राष्ट्रांच्या सनदेची मूलभूत तत्त्वे आणि देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर यासह विविध मुद्द्यांवर बीजिंगच्या घोषित भूमिकेच्या विरोधात आहे, असे अमेरिकेने म्हटले होते.

Advertisement

बायडेन म्हणाले होते, की रशिया आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँक यांसारख्या वित्तीय संस्थांकडून निधीची मागणी करणार नाही याची खात्री करण्यासाठी G7 नेते सहमत होतील. तसेच त्यांनी रशियावर नवीन निर्बंध लादण्याची घोषणा केली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आक्रमक असून त्यांना या कृत्याची किंमत द्यावी लागेल, असे अमेरिकेचे बायडेन यांनी म्हटले होते.

Loading...
Advertisement

Russia Ukraine War : चीनच्या खेळीने अमेरिका अस्वस्थ; बायडेन थेट जिनपिंग यांना करणार फोन; पहा, नेमके काय घडले..?

Advertisement

स्पष्टपणे सांगा, की रशियाला घाबरलात..! संतापलेल्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘या’ संघटनेला फटकारले..

Advertisement

अखेर अमेरिकेने खरे काय ते सांगितलेच..! रशियाबाबत भारताच्या धोरणाबाबत दिलीय ‘ही’ प्रतिक्रिया..

Advertisement

‘त्यामुळेच’ घडलेय रशिया-युक्रेन युद्ध; चीनने केलाय खळबळजनक दावा; अमेरिकेलाही दिलीय धमकी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply