Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून रवी शास्त्रींनी केलेय रोहित शर्माचे कौतुक.. कर्णधार पदाबाबतही दिलेय स्पष्टीकरण; जाणून घ्या..

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी आता कर्णधार रोहित शर्माबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ज्यामुळे माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नाराज होण्याचीही शक्यता आहे. रवी शास्त्री म्हणाले, की ‘आयपीएलमध्ये (IPL) मी पहिली 11 वर्षे माझे काम केले, पण नंतर काही कारणांमुळे कॉमेंट्री (Commentary) करू शकलो नाही.’

Advertisement

त्यानंतर रवी शास्त्री यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) कौतुक केले आणि म्हटले, की तो खूप चांगले काम करत आहे. परंतु भविष्यात संघाचा कर्णधार कोण असेल ते पहावे लागणार आहे. शास्त्री म्हणाले, की विराटने आधीच राजीनामा दिला आहे. रोहित हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कर्णधार आहे, पण मला वाटते की यंदा आयपीएलमध्ये भविष्यात संघाचा कर्णधार (Captain) कोण असेल याकडे लक्ष असेल.

Loading...
Advertisement

भारताच्या भावी कर्णधाराबद्दल सांगताना रवी शास्त्री म्हणाले की, दरवर्षी अनेक खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. रवी शास्त्री म्हणाले की, आयपीएल ही अनेक खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघाचा भावी कर्णधार म्हणून शोधण्याची संधी आहे. शास्त्री म्हणाले की, आयपीएलच्या प्रत्येक वेळी काही खेळाडूंनी आपले कौशल्य सिद्ध केले. मागील आयपीएलमध्ये व्यंकटेश अय्यर होता. मात्र, कुणाही त्याच्याबाबतीत ऐकले नव्हते. आणि ज्यावेळी आयपीएल स्पर्धा संपली त्यावेळी तर तो भारतीय संघात होता. त्यामुळे येथे काहीतरी अनपेक्षित घडण्याचीही शक्यता कायम असते, असे शास्त्री यावेळी म्हणाले.

Advertisement

IPL 2022: IPL वर पुन्हा संकट; राज्य सरकार घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय

Advertisement
Advertisement

Leave a Reply