Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेतीबाबत झालाय महत्वाचा निर्णय; पहा नेमका काय परिणाम होणार तुमच्यावर

मुंबई : राज्यात शेती करणे म्हणजे मोठे आव्हान झालेले असतानाच शेतीचा व्यावसायिक वापर करतानाच्या अडचणी पार करणे म्हणजे दिव्य आहे. बिगर शेती करण्यासाठी लाखोंची लाच द्यावी लागत असल्याने जमिनीचे भाव सामान्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. अशावेळी आता आणखी एक महत्वाची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधान परिषदेत केली आहे.

Loading...
Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ या कायद्यात कालानुरूप काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यात ८ आणि ८ ब हे कलम समाविष्ट करण्यात आले असून महाराष्ट्राच्या जनतेतील गैरसमज दूर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बिगर शेतीकरिता महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्राची प्रक्रिया अधिक सोपी करण्याची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, आपली शहरे आणि शहरांभोवती होणारी वाढ रोखणे हा यामागील उद्देश असून कायद्यातील ८ ब ची अंमलबजावणीही व्यवस्थित झाली नाही. यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या शहरात कोणते बदल करावेत यासंदर्भात त्यांना कळवण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सदाशिव खोत, प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. (balasaheb thorat gives information on land record and na property in maharashtra)

Advertisement
Advertisement

Leave a Reply