नवी दिल्ली : चीनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. चीनमधील ‘बोईंग-737’ हे विमान चीनच्या गुआंगशी प्रांतातील जंगलात कोसळले. जंगलात कोसळल्यानंतर विमानाला मोठी आग लागली. या विमानातून 133 प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात किती जणं दगावले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे ‘बोईंग-737’ हे विमान कुन्मिंग (Kunming) येथून गुआंगजू (Guangzhou) कडे जात होतं. MU5735 या विमानानं दक्षिण पश्चिम चीनमधील युन्नान प्रांतातील कुन्मिंग शहरातील चॅंगशूई (Changshui) विमानतळावरुन आज दुपारी 1.15 वाजता उड्डाण घेतलं, ते 3 वाजेपर्यंत Guandong प्रांतातील Guangzhou येथे पोहोचणार होतं. मात्र त्यापूर्वीच हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं. हे विमान गुआंगशी प्रांतातील जंगलात कोसळले. त्यानंतर विमानानं पेट घेतला. त्यामुळे या जंगलालाही आग लागल्याचे समोर आलेय.
दरम्यान, चीनमधील बचावपथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. जे विमान दुर्घटनाग्रस्त झालं, ते 6 वर्षांचं आहे. जून 2015 मध्ये या विमानाचा वापर करण्यास सुरुवात झाली होती. या विमानात 162 सीट होत्या. त्यापैकी 12 बिझनेस क्लास आणि 150 इकोनॉमी क्लासच्या होत्या.
दुर्घटनाग्रस्त विमान ‘चायना इस्टर्न एअरलाइन्स’चे असून, 133 प्रवाशांना घेऊन ते कुनमिंगहून ग्वांगझूला निघाले होते. त्यावेळी गुआंग्शी प्रदेशात या विमानाला अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे, तो डोंगराळ भाग असून अपघातानंतर डोंगराला आग लागली. दरम्यान, विमानात प्रवास करत असेलल्या प्रवाशांबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
अर्र..CSKच्या अडचणींत वाढ: 8 कोटी देऊनही ‘हा’ स्टार खेळाडू; अद्याप भारतात पोहचलाच नाही
बाप रे… विषारी दारू प्यायल्याने 18 जणांचा मृत्यू, अनेकांची मृत्यूशी झूंज सुरु…!