Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मणिपूरसाठी ‘हा’ आहे राजकीय प्लान..! कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री; पहा, काय आहेत घडामोडी..

मुंबई : मणिपूर राज्यातही भाजपने जबरदस्त कामगिरी करत बहुमत मिळवले आहे. मात्र, या राज्यातही मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सरकार कधी स्थापन होणार याबाबतही स्पष्टता नाही. त्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी शनिवारी सांगितले, की मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील. मी भाजप केंद्रीय नेतृत्वाला भेटण्यासाठी दिल्लीत आलो आहे. राज्यात भाजप सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून एन. बिरेन सिंह आणि ज्येष्ठ आमदार टी, बिस्वजित सिंह यांची नावे आघाडीवर आहेत.

Advertisement

भाजप सूत्रांनी सांगितले की पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सूचनेनंतर दोन्ही नेते राष्ट्रीय राजधानीला रवाना झाले आणि यावेळी मुख्यमंत्री कोण होणार हे रविवारपर्यंत कळेल अशी शक्यता आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बिरेन सिंह, टी. बिस्वजित या दोघांपैकी कोण पुढचा मुख्यमंत्री होणार जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबतचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल. या राज्यात भाजपने 60 सदस्यांच्या विधानसभेत 32 जागा जिंकल्या आहेत.

Advertisement

2017 मध्ये काँग्रेसच्या 28 च्या तुलनेत केवळ 21 जागा असतानाही भाजपने दोन स्थानिक पक्ष NPP आणि NPF बरोबर सरकार स्थापन करण्यात यश मिळवले. मात्र, यावेळी भाजपने स्वबळावर निवडणूक लढली आणि बहुमत मिळवण्यात यश मिळविले. अलीकडेच, मणिपूरचे ज्येष्ठ आमदार टी. बिस्वजित सिंह यांनी मणिपूर भाजपमध्ये कोणतीही गटबाजी नसल्याचे म्हटले होते. इंफाळ विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सिंह म्हणाले की, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने नवीन मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला उशीर झाला.

Advertisement

दरम्यान, उत्तराखंडच्या (Uttarakhand) नव्या मुख्यमंत्र्यांबाबत (Chief Minister) रविवारी निर्णय घेतला जाऊ शकतो आणि त्यासाठी भाजपने (BJP) राज्यातील नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित केली आहे. राज्यात पक्षाने 47 जागा जिंकल्या असून आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत उद्या निर्णय होऊ शकतो, असे मानले जात आहे. यासाठी भाजपने 20 मार्च रोजी सर्व आमदारांना डेहराडूनला (Dehradun) बोलावले असून उद्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

Loading...
Advertisement

सध्या राज्यात मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय झालेला नाही. राज्यात अनेक दावेदार असले तरी पार्टीने अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही किंवा अधिकृतपणे घोषणाही केलेली नाही. मात्र, तरीही यावेळी सुद्धा माजी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेच मुख्यमंत्री असतील, असे सांगण्यात येत आहे. पक्षाने आपल्या आमदारांना 20 मार्च रोजी डेहराडूनला बोलावले आहे जेणेकरून बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय घेता येईल.

Advertisement

उत्तराखंडमध्ये राजकीय घडामोडी जोरात..! ‘त्यासाठी’ भाजपने सर्व आमदारांना दिलाय ‘हा’ आदेश..

Advertisement

उत्तराखंड मुख्यमंत्री पदाबाबत नवीन अपडेट..! पहा, भाजपने कोणाला मुख्यमंत्री करायचे ठरवलेय..?

Advertisement

मणिपूर आणि गोव्याचा मुख्यमंत्री कोण..? ; पहा, काय आहे भाजप नेतृत्वाचा प्लान..

Advertisement
Advertisement

Leave a Reply