मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील 7231 कॉन्स्टेबल पदांची भरती लवकरच सुरु करणार आहोत. पोलिस भरतीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ही पदभरती करताना गैरप्रकार होणार नाहीत. पारदर्शक पद्धतीनं ही भरती केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली..
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्नावर उत्तर देताना वळसे पाटील बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात 5297 पदांची पोलिस भरती अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत पोलिस भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल. उमेदवारांना नेमणूक आदेश देण्यासंदर्भातील कार्यवाही सुरु आहे. काही ठिकाणी मुलाखती घेण्याचे काम सुरु आहे. येत्या काही दिवसांत 2019 ची पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे ते म्हणाले.
राज्याच्या पोलिस दलातील 7231 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं आणखी पदांची भरती करण्यात येईल. राज्यातील विविध पोलिस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांतर्गत 5200 कॉन्स्टेबल पदाची भरती सुरु आहे. विविध जिल्ह्यातील पोलीस भरती अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या काळात 5200 पदांवर युवकांना पोलीस कॉन्स्टेबल पदावर संधी मिळणार आहे.
महाराष्ट्रातील पोलिस दलात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. पुरेसे पोलिस बळ नसल्याचे सध्याच्या पोलिसांवर कामाचा ताण येत आहे. शिवाय अनेक कर्मचाऱ्यांना 12 तासांपेक्षा अधिक वेळ ड्युटी करावी लागते. या साऱ्याचा परिणाम पोलिसांच्या आरोग्यावरही होत आहे. शिवाय राज्यात गुन्हेगारी वाढत असून, अनेक गुन्ह्यांचा तपास रखडला आहे. त्यातून राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.. राज्य सरकारने पोलिस भरतीबाबत घोषणा केल्याने अनेक बेरोजगार तरुणांना दिलासा मिळाला आहे..
बच्चे कंपनीच्या आवडत्या ‘मॅगी’बाबत मोठा निर्णय.. खाण्याचे वांदे होणार…!
…तर भारत पुन्हा खेळू शकतो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल; जाणून घ्या संपूर्ण समीकरण