Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बच्चे कंपनीच्या आवडत्या ‘मॅगी’बाबत मोठा निर्णय.. खाण्याचे वांदे होणार…!

मुंबई : वाढत्या महागाईनं (Inflation) सामान्य माणसांचे कंबरडं मोडलंय. गेल्या काही दिवसांत दूधाचे दर वाढले होते. त्यानंतर ‘हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड’नं गेल्या महिन्यांत चहाच्या किमती वाढवल्या. कंपनीनं ‘ब्रू’ कॉफीच्या दरातदेखील 3 ते 7 टक्के वाढ केली होती. ताजमाहल चहाच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली होती. आता झटपट तयार होणाऱ्या ‘मॅगी’च्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय.

Advertisement

मॅगीच्या 70 ग्रॅमच्या पाकिटाची किंमत आता दोन रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे 12 रुपयांना मिळणारे हे पाकिट आता 14 रुपयांना झाले आहे. तसेच, 140 ग्रॅमच्या पाकिटाच्या किमतीत 3 रुपयांनी वाढ झाली.. 560 ग्रॅमच्या पाकिटाच्या किंमतीत 9.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 96 रुपयांना मिळणारं 560 ग्रॅमचं मॅगी पाकिट आता 105 रुपयांना मिळणार आहे. ‘नेस्ले’ आणि ‘एचयूएल’ यांनी आपल्या प्रॉडक्ट्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नेस्ले’नं मॅगीच्या किंमतीत 9 ते 16 टक्क्यांनी वाढ केलीय. ‘मॅगी’च्या नवीन किंमती लगेच लागू करण्यात आल्या आहेत.

Advertisement

कशामुळे मॅगी महागली..?
‘मॅगी’चा उत्पादनखर्च वाढला आहे. रशिया व यूक्रेनमधील युद्धामुळं गहू महागला असून, त्याचा परिणाम मॅगीच्या किंमतीवर झाल्याचे सांगण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर गेल्या 9 वर्षात सर्वाधिक पातळीवर आहेत. मकाही गेल्या 8 महिन्यांतील सर्वादिक दरानं विकली जात आहे. त्यामुळे ही दरवाढ झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Loading...
Advertisement

फेब्रुवारीमध्ये ठोक महागाई दर वाढून 13.11 टक्के झालाय. जानेवारी महिन्यात हा दर 12.96 टक्के होता. पुढील महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ‘मॉनेटरी पॉलिसी’ जारी केली जाणार आहे. महागाईच्या वाढत्या दरामुळं रिझर्व्ह बँकेच्या धोरणात बदल करण्यासंदर्भातील दबाव वाढू शकतो.

Advertisement

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’नं लाईफबॉय, लक्स आणि पिअर्स साबणांसोबत सर्प एक्सेल मॅटिक, कम्फर्ट फॅब्रिक कंडिशनर, डव बॉडी वॉश या वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ केली होती.

Advertisement

Virat Kohli: कोहलीला बसला मोठा धक्का; पाच वर्षांनंतर घडली ‘ही’ धक्कादायक घटना
आमरसाचा भुरका महागणार.. कोकणातील आंबा उत्पादकांवर कोसळलेय ‘हे’ संकट..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply