Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL-2022 : यंदाच्या हंगामात स्पर्धेच्या नियमांमध्ये मोठे बदल, रोमांच वाढणार..!

दिल्ली : ‘आयपीएल’ म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी जणू मेजवानीच.. येत्या 26 मार्चपासून ही मेजवानी चाहत्यांसमोर येणार आहे. ‘आयपीएल’चा (IPL2022) 15वा हंगाम 26 मार्चपासून सुरू होत आहे. यंदाच्या हंगामात अनेक महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यंदा ‘आयपीएल’मधल्या संघांची संख्या 8 वरून 10 झालीय. त्यामुळे संघांची विभागणी 2 गटांमध्ये करण्यात आली आहे. पुण्या-मुंबईत सर्व संघांमध्ये 70 सामने खेळवले जाणार आहेत.

Advertisement

‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल 2022’साठी आणखी काही नवे नियम तयार केले आहेत. त्यामुळे ‘आयपीएल’चा रोमांच आणखी वाढणार असल्याचे बोलले जाते.. काही नियमांचा दोन्ही संघांना फायदा होईल, तर काही नियम असे आहेत, ज्यांचा फायदा फक्त एकाच संघाला होणार आहे. त्यामध्ये संघांच्या ‘प्लेइंग इलेव्हन’पासून ते ‘डीआरएस’पर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. या नवीन नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

Advertisement

‘आयपीएल’मधील नवे नियम
‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये बदल करता येणार

कोरोना संसर्ग कमी झालेला असला, तो संपलेला नाही. त्यामुळे अनेक संघांना कोरोनाचा फटका बसू शकतो. कोरोनामुळे खेळाडू न मिळाल्यास संघांची अडचण होऊ नये, यासाठी ‘बीसीसीआय’ने (BCCI) नियम बनवला आहे. एखाद्या टीममधील खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यास, टीमच्या ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये बदल करता येणार आहे. कोरोनामुळे एखादी टीम ‘प्लेइंग इलेव्हन’ही तयार करु शकत नसल्यास, सामन्याचे वेळापत्रक बदललं जाईल. नंतरही सामना होऊ शकला नाही, तर हे प्रकरण तांत्रिक समितीकडे सोपवलं जाईल.

Loading...
Advertisement

‘डीआरएस’चा अधिक वापर होणार
‘बीसीसीआय’च्या नव्या नियमांनुसार, प्रत्येक डावातल्या ‘डीआरएस’ची संख्या आता एक ऐवजी दोन केली आहे. त्यामुळे प्रत्येक डावात दोनदा ‘डीआरएस’ घेता येणार आहे. यापूर्वी प्रत्येक डावात एकदाच डीआरएस घेता यायचा. आता दोन्ही टीमला प्रत्येकी 2 ‘डीआरएस’ वापरता येतील.

Advertisement

लीग स्टेजमधील विजयाला महत्व
‘आयपीएल 2022’ मध्ये ‘प्लेऑफ’ किंवा फायनल मॅचमध्ये सामना टाय झाल्यास निर्धारित वेळेत सुपर ओव्हर (super over) किंवा त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरने निर्णय न झाल्यास लीग स्टेजचा खेळ पाहायला मिळेल. जो संघ लीग स्टेजमध्ये जिंकलेला असेल, तो विजेता मानला जाणार आहे..

Advertisement

‘त्या’ खेळाडूला बाबरने केला OUT; अन्.. PCB ने ट्विट केली ‘ही’ पोस्ट; आला चर्चांना उधाण
IPL 2022: चेन्नई-मुंबईसह आयपीएल संघांना हार्दिकचा गंभीर इशारा…, म्हणाला..

Advertisement
Advertisement

Leave a Reply