Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

UP Elections : अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; ‘या’ नेत्याला दिलेय विरोधी पक्षनेते पद; पहा, काय आहे राजकीय गणित..?

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानंतर आता समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. अखिलेश यादव यांनी प्रगतीशील समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवपाल सिंह यादव यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे. शिवपाल यादव हे जसवंतनगर मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

Advertisement

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नवी परंपरा सुरू केली आहे. प्रगतीशील समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवपाल सिंह यादव यांना उत्तर प्रदेश विधानसभेतील समाजवादी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. शिवपाल सिंह यादव आता विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावणार आहेत. याआधी हे पद राम गोविंद चौधरी यांच्याकडे होते, निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

Advertisement

मैनपुरीतील करहल मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर आता विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेतही अखिलेश यादव यांनी याद्वारे दिले आहेत. ते आजमगडमधून समाजवादी पक्षाचे खासदार आहेत. जिथून सपाला मोठे यश मिळाले आहे. पूर्वांचलमध्ये समाजवादी पक्षाने चमकदार कामगिरी केली आहे. याबरोबरच अखिलेश यादव यांचे लक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीवरही आहे. त्यामुळे ते लोकसभा खासदार म्हणूनच राहतील आणि विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप आधिकृत काहीही माहिती नाही.

Loading...
Advertisement

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, यावेळी त्यांच्या जागा वाढल्या आहेत. तसेच मतांची टक्केवारी सुद्धा वाढली आहे. 2017 च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे 47 उमेदवार निवडून आले होते. यावेळी मात्र 125 उमेदवार विजयी झाले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या मतांच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. भाजप विजयी असला तरी यावेळी त्यांना काही जागांचे नुकसान सहन करावे लागले आहे. तर समाजवादी पार्टीची विधानसभेतील ताकद वाढली आहे.

Advertisement

UP Election Result : निकालानंतर अखिलेश यादव यांनी दिलीय प्रतिक्रिया; ‘त्यासाठी’ मानलेत जनतेचे आभार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply