Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी.. आता नवा कांगावा..! म्हणे, ‘भारताने आमच्यावर…’

दिल्ली : रशिया व युक्रेनमधील युद्धाचे चटके साऱ्या जगाला बसत आहे. जगभरातील आर्थिक व्यवस्थेला या युद्धाने तडे गेले आहेत. त्यामुळे सारे जग ‘युद्ध नकोच..’ अशा भूमिकेत असताना, भारताच्या शेजाऱ्याला आता युद्धाची खुमखुमी आल्याचे दिसत आहे. त्यासाठी पाककडून रोज काहीतरी कांगावा केला जात आहे. नुकताच पाकिस्तानने भारतावर मोठा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताने आमच्यावर मिसाईल डागले. भारतने डागलेलं हे मिसाईल त्यांच्या पंजाब प्रांतात पडल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे.

Advertisement

पाकचा कांगावा
याबाबत पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी माध्यमांना माहिती दिली. त्यांनी असं म्हटलं, की पंजाब प्रांतात पडलेलं मिसाईल भारताकडून आमच्या हवाई हद्दीत येताना आढळलं. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार म्हणाले, की 9 मार्च रोजी संध्याकाळी 6.43 वाजता एक अति वेगवान वस्तू भारतीय हद्दीतून उडाली आणि आपला रस्ता चुकवून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून येऊन पडली. त्यात जीवितहानी झालेली नसली, तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय…

Advertisement

दरम्यान, याबाबत भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.. मेजर जनरल इफ्तिखार म्हणाले, की बुधवारी रात्री पंजाबमधील खानेवाल जिल्ह्यातील मियाॅं चन्नू भागात अज्ञात वस्तू (मिसाईल) पडली होती. ते पृष्ठभागावरून प्रक्षेपित करण्यात आलं होतं. याबाबत माहिती मिळताच पाकिस्तानी हवाई दलानं शोधमोहीम सुरू केली आहे.

Loading...
Advertisement

म्हणे भारताने कारण सांगावे..
भारताकडून डागण्यात आलेल्या मिसाईलमुळे भारत-पाकिस्तानमधील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. याचे कारण भारताने सांगावं. त्यामुळे मोठी विमान दुर्घटना घडू शकते. एका प्रश्नाच्या उत्तरात पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, ते मिसाईल टाकलं गेली नाही, तर ते स्वतः पडलं. हे क्षेपणास्त्र 40,000 फूट उंचीवरून जात असल्याचेही सांगण्यात आलं..

Advertisement

आहात का तयार.. कारण खिसा खाली होणार..! म्हणून सोने, पेट्रोलसह ‘त्या’ गोष्टींचा महागाई बॉंब फुटणार
म्हणून इम्रान खान सरकार संकटात; पहा CIA ने नेमके काय करून ठेवलेय पाकिस्तानात

Advertisement
Advertisement

Leave a Reply