Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

निवडणुकीचे निकाल जाहीर, पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा…

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल गुरुवारी (ता. 10) जाहीर झाले. त्यात भारतीय जनता पक्षाने 4 राज्यांमध्ये सत्ता कायम राखण्यात यश मिळवले.. मात्र, निवडणुक निकाल जाहीर होताच, पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार असल्याची शक्यता काही दिवसांपासून वर्तवण्यात येत होती. कारण, रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. परिणामी, भारतात इंधन दरवाढ अटळ असल्याचे बोलले जात होते.. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही विरोधकांनीही याच मुद्द्यावर भाजपवर निशाणा साधला होता. त्यामुळे गुरुवारी निकाल जाहीर झाल्यावर आज (शुक्रवारी) पेट्रोल-डिझेलचे दर किती रुपयांनी वाढतात, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले होते..

Advertisement

या साऱ्या पार्श्वभूमीवर आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जाहीर केले आहेत. निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Rates) दरात कुठलेही बदल झालेले नाहीत. सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल-डिझेल दरानुसार, दिल्लीसह विविध शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडणार असल्याचे बोलले जात होते, परंतु आज तरी तसं काही चित्र दिसलं नाही.

Advertisement

प्रमुख शहरातील इंधन दर (प्रति लिटर)

Loading...
Advertisement
  • दिल्ली- पेट्रोल 95.41 रुपये, डिझेल – 86.67 रुपये
  • मुंबई- पेट्रोल – 109.98 रुपये, डिझेल – 94.14 रुपये
  • कोलकाता – पेट्रोल 104.67 रुपये, डिझेल- 89.79 रुपये
  • चेन्नई – पेट्रोल- 101.40 रुपये, डिझेल- 91.43 रुपये
  • लखनौ – पेट्रोल- 95.28 रुपये, डिझेल- 86.80 रुपये
  • नोएडा – पेट्रोल- 95.51 रुपये, डिझेल- 87.01 रुपये
  • भोपाळ- पेट्रोल 107.23 रुपये, डिझेल- 90.87 रुपये

कच्च्या तेलाचे दर वाढले
रशिया-यूक्रेनमध्ये गेल्या 10 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. त्याचे जागतिक परिणाम दिसत आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. जागतिक बाजारात क्रूड ऑईल (Crude Oil)च्या किमतीवर पेट्रोल-डिझेलची किंमत दररोज बदलते. तेल कंपन्या या दराचा आढावा घेत पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या दररोज सकाळी विविध शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट करत असतात.

Advertisement

आहात का तयार.. कारण खिसा खाली होणार..! म्हणून सोने, पेट्रोलसह ‘त्या’ गोष्टींचा महागाई बॉंब फुटणार
ई-व्हेईकल घेण्यापूर्वी वाचा हा महत्वाचा रिपोर्ट; पहा कोणत्या कारमध्ये आहे लोकांना इंटरेस्ट

Advertisement
Advertisement

Leave a Reply