Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक, ज्येष्ठ लेखक-संपादक पंढरपुरात भीक मागताना आढळले.. नाव वाचून बसेल धक्का..

मुंबई : पंढरपूरमधील भक्ती मार्ग परिसरात गुरुवारी (ता. 10) एक व्यक्ती भीक मागत होती.. तेथून ये-जा करणाऱ्या लोकांकडे मदतीसाठी याचना करीत होती.. तेही अगदी अस्खलित इंग्रजीत.. एक भिकारी फाड फाड इंग्रजीत बोलताना पाहून तेथील लोकही आश्चर्यचकीत झाले. याबाबत माहिती मिळताच तेथे काही समाजसेवक पोहोचले. त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून तेही काही काळ गोंधळून गेले. त्या व्यक्तीची जवळ जाऊन विचारपूस केली असता, त्याने “Will you please arrange me 50 rupees? I will pay back…’ ‘मला एक टॉवेल खरेदी करायचाय, जेणेकरून मी अंघोळ करू शकेल…’ असे ती व्यक्ती म्हणाली.

Advertisement

समाजसेवकांनी या व्यक्तीची चौकशी केल्यावर क्षणभर त्यांचाही स्वत:वर विश्वास बसला नाही.. ही व्यक्ती दुसरे-तिसरे कोणी नसून, ज्येष्ठ साहित्यिक, संपादक एम. जी. भगत असल्याचे समोर आले.. एका प्रतिथयश लेखकावर भीक मागण्याची वेळ आल्याचे पाहून अनेकांना धक्काच बसला.. पंढरपुरमध्ये रस्त्यावर निराधार, दयनीय अवस्थेत ते भीक मागत होते.. भगत यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना पूर्ण शुद्धही नव्हती. एका ज्येष्ठ साहित्यिकाची अशी अवस्था झालेली पाहून अनेकांना गलबलून आले. समाजसेवकांनी त्यांना तातडीने सोलापूर जिल्हा रुग्णालयात हलविले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

Advertisement

त्यानंतर खुद्द भगत यांनीच त्यांच्यावर ही वेळ कशी आली, याबाबतची माहिती दिली.. ते म्हणाले, की “मी वर्ध्याचा रहिवासी आहे. पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी रेल्वेने निघालो होतो. प्रवासादरम्यान मोबाईल, सामान नि सगळे पैसे गायब झाले. मला काही कळलेच नाही. माझ्या हाता-पायाला दुखापत झाली. मला हालचाल करता येत नाहीय. तीन दिवस मी रेल्वेस्टेशन बाहेरील रस्त्यावर पडून आहे. अनेकदा माझी शुद्धी हरपते. लोक मला भिकारी समजून अन्न – पाणी देतात. मात्र, त्यांना काही सांगण्याइतकेही त्राण माझ्यात नव्हते.”

Loading...
Advertisement

एका ज्येष्ठ साहित्यिकावर इतकी भीषण वेळ आल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.. अनेकांनी त्याबाबत हळहळ व्यक्त केली..

Advertisement

Corona Update : कोरोना येतोय आटोक्यात..! 24 तासांत सापडलेत फक्त ‘इतके’ नवे रुग्ण; जाणून घ्या..
Manipur Elections : भाजप करतोय बहुमताकडे वाटचाल; काँग्रेस मात्र कोमात.. पहा, किती जागांवर घेतलीय आघाडी..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply