Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

UP Assembly Election Result 2022 : उत्तर प्रदेशात ‘या’ पक्षांनीही केले होते मोठे रेकॉर्ड; चार वेळा घडलाय ‘हा’ चमत्कार..

मुंबई : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत आज सकाळपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. 18 व्या विधानसभेत किती जागांवरून सरकार कोण बनवणार याचा निर्णय लवकरच होणार आहे, पण उत्तर प्रदेशचा इतिहास पाहिला तर इथे बहुमतात सरकार स्थापन करणाऱ्या पक्षांनी केवळ चार वेळा 300 चा टप्पा पार केला आहे. याची सुरुवात 1951 मध्ये पहिल्याच निवडणुकीपासून झाली. आतापर्यंत 300 हून अधिक जागा जिंकण्याचा विक्रम भाजप, काँग्रेस, जनता पक्षाच्या नावावर आहे.

Advertisement

2017 मध्ये भाजपने 312 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. याआधी 1991 मध्ये भाजपला 221 जागा मिळाल्या होत्या, परंतु 1951 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 413 जागांपैकी 388 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. मात्र, हा विक्रम अद्याप मोडीत निघालेला नाही. त्याच वेळी, आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत, 1977 मध्ये जनता पक्षाने 352 जागा जिंकून सरकार स्थापन केले आणि काँग्रेस फक्त 47 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 1980 मध्ये मात्र काँग्रेसने 309 जागा जिंकल्या होत्या आणि तेव्हा भाजप फक्त 11 जागांवर होता.

Advertisement

250 ते 300 जागा जिंकण्याबाबत सांगितले तर त्यातही काँग्रेसचे नाव येते. काँग्रेसने 1957 मध्ये 286 जागा जिंकल्या होत्या आणि त्यानंतर 1985 मध्ये 269 जागा जिंकल्या होत्या, त्यावेळी फक्त भाजपला 16 जागा जिंकता आल्या होत्या. त्याचबरोबर 200 जागांपैकी 250 जागा अनेक पक्षांनी जिंकल्या आहेत. काँग्रेसने 1962 मध्ये 249, 1969 मध्ये 211, 1974 मध्ये 215, 1969 मध्ये 205, 1991 मध्ये भाजपने 221, 2007 मध्ये बसपा 206 आणि 2012 मध्ये सपाने 224 जागा जिंकल्या होत्या.

Advertisement

दरम्यान, मागील निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला होता. तब्बल 312 जागा जिंकल्या होत्या. यावेळी कोण बाजी मारणार हे काही वेळात स्पष्ट होणार आहे. सुरुवातीच्या निकालात भाजप आघाडीवर दिसत आहे. मात्र समाजवादी पार्टी सुद्धा जोरदार टक्कर देताना दिसत आहे.

Loading...
Advertisement

पक्ष-जागा- निवडणुकीचे वर्ष
काँग्रेस -388-1951
भाजपा- 312- 2017
एसपी- 224-2012
BSP-206-2007

Advertisement

LIVE GOA Assembly Election Result 2022 : सत्तेसाठी कॉंग्रेस देत आहे भाजपला कडवे आव्हान

Advertisement

Manipur Assembly Election Result : मणिपूरमध्ये कोण आघाडीवर.. पहा, काय आहेत सुरुवातीचे अपडेट

Advertisement
Advertisement

Leave a Reply