Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युक्रेनला मदत करणाऱ्या 31 शत्रू राष्ट्रांची यादी रशियाकडून जाहीर.. भारत शत्रू की मित्र..?

नवी दिल्ली : रशिया व युक्रेनमधील युद्ध काही केल्या संपत नसल्याचे दिसते.. रशियाच्या हल्ल्यात युक्रेन अक्षरश: बेचिराख झाला आहे… त्याच वेळी युद्धाच्या झळा रशियालाही बसल्या आहेत. जगभरातील अनेक देशांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादले असल्याने रशियावर आर्थिक संकटाचे ढग दाटू लागले आहेत. युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर युरोपातील अनेक देशांकडून दबाव आणला जात आहे. अमेरिकेसह पाश्चात्य देश सतत त्यांच्यावर टीका करीत असून, निर्बंध लादले जात आहेत. अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याच्या उद्देशाने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत..

Advertisement

जगभरातून रशियावर दबाव वाढत असताना, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपल्या देशाच्या 31 शत्रू राष्ट्रांची यादीच जाहीर केलीय. त्यात अमेरिका, ब्रिटन, युक्रेन, जपान, तसेच युरोपीय संघातील सदस्य देशांचा समावेश आहे. युरोपियन युनियनमध्ये एकूण 27 देश आहेत. रशियन सरकारने शत्रू देशांच्या यादीला मान्यता दिल्याचा दावा चीनच्या सरकारी मीडियाने केला आहे.

Advertisement

शत्रू देशांची यादी
अमेरिका : अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्या प्रवेशावर बंदी घातलीय. शिवाय रशियाच्या 4 बँका आणि राज्य ऊर्जा कंपनी ‘गॅझप्रॉम’वरही बंदी घातली आहे. अमेरिकेने रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्दही बंद केली आहे. सोबतच अमेरिकेने युक्रेनला शस्त्रे पाठवली असून, आर्थिक मदतीचीही घोषणा केली आहे.

Advertisement

ब्रिटन : रशियाच्या सरकारी मालकीच्या एअरलाइनने ‘एरोलॉफ्ट’साठी ब्रिटनने आपले हवाई क्षेत्र बंद केलेय. ब्रिटनने 5 रशियन बँकांवर बंदी घातलीय. सोबतच पुतिन यांची संपत्ती जप्त करून त्यांची खाती गोठवण्यासही सांगितले आहे. रशियाच्या अब्जाधीशांनीही खासगी जेट विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. अमेरिकेप्रमाणेच ब्रिटननेही युक्रेनला लष्करी आणि आर्थिक मदत पाठवलीय.

Advertisement

युक्रेन : रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनला वेगळा देश मानत नसल्याचेही म्हटले आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाने आपले ५०० सैनिक गमावल्याचे मान्य केले आहे.

Loading...
Advertisement

जपान : रशियाविरुद्ध लढण्यासाठी जपान युक्रेनला शस्त्रे पुरवित आहे. बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेटसह अनेक संरक्षक उपकरणे जपानने युक्रेनला पाठवली आहेत. मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी सांगितले, की जपानकडून युक्रेनला विविध साहित्य पाठवले जात आहेत. शिवाय जपानने 4 रशियन बँकांची मालमत्ता जप्त करण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

युरोपियन युनियन : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने युरोपियन युनियनने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. युरोपियन युनियनमध्ये 27 देशांचा समावेश आहे. युरोपियन युनियनच्या सर्व सदस्यांनी त्यांची हवाई हद्द रशियन विमानांसाठी बंद केलीय. शिवाय युरोपियन युनियनमध्ये उपस्थित असलेल्या रशियन अब्जाधीशांच्या मालमत्ताही जप्त केल्या आहेत. युरोपियन युनियनमधील सर्व देश युक्रेनला आर्थिकच नव्हे, तर लष्करी मदत करीत आहेत.

Advertisement

युरोपियन युनियनचे सदस्य देश – ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लॅटव्हिया, लिथुनिया, लक्झमबर्ग, माल्टा, नेदरलँडस, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन.

Advertisement

Russia-Ukraine War : अमेरिकेने ‘या’ दोन देशांना दिलेय मोठे आश्वसान; पहा, युरोपात काय सुरू आहे राजकारण..?
आजही सोन्या-चांदीच्या दरात जबरदस्त वाढ..! रशिया-युक्रेन युद्धाचा होतोय ‘असा’ ही इफेक्ट; चेक करा, डिटेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply