Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशिया दारुच्या थेंबा थेंबासाठी तरसणार.. ‘या’ मोठ्या कंपनीने घेतला महत्वाचा निर्णय..!

नवी दिल्ली : युक्रेनवर हल्ला केल्याचा परिणाम म्हणून रशियावर जगभरातील देशांकडून निर्बंध घालण्यात येत आहे. एकप्रकारे रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.. जर्मनीने रशियाच्या अब्जाधीशाची जगातील सर्वात मोठी ‘यॉट’ जप्त केली, दुसरीकडे जगभरातील कंपन्या रशियाच्या बाजारातून बाहेर पडत आहेत. जगप्रसिद्ध कंपनी अॅपल, फोर्डने रशियात आपल्या मालाची विक्री बंद केली आहे. शिवाय अन्य कंपन्यांनीही रशियातील आपला व्यापार थांबविण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

जगातील सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक असलेल्या ‘डियाजियो’ या मद्यनिर्माता कंपनीनेही रशियाला टाटा केला आहे. रशिया व बेलारुसमध्ये होणारा दारुचा पुरवठा या कंपनीने रोखला आहे. त्यामुळे दारुच्या एका थेंबा थेंबासाठी रशियन नागरिक तरसण्याची शक्यता आहे. डियाजियो (Diageo) कंपनी जॉनी वॉकर, कॅप्टन मॉर्गन, गिनीज, स्मिरनॉफ, व्हाइट हॉर्स यांसारखे मद्याचे ब्रँड बनविते. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठा फर्निचर ब्रँड असलेल्या ‘आयकिया’नेही रशिया व बेलारुसमधील आपले काम बंद केले आहे.

Advertisement

रशियाच्या ‘नेक्स्टा’ टीव्हीनुसार ‘डियाजिओ’ने रशियामध्ये केला जाणारा दारूचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक देशांनी रशियावर यापूर्वीच निर्बंध लादले असताना ‘डियाजिओ’ने हा निर्णय घेतला आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर इतर अनेक कंपन्यांनी आपला पुरवठा थांबवला आहे.

Loading...
Advertisement

‘इंगका ग्रुप’ (Ingka Group) हा आयकियाचा मालक आहे. कंपनीने म्हटले की, युद्धाचा मानवी जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. युद्धामुळे व्यापारात मोठा व्यत्यय येत आहे. त्यामुळे रशियातील IKEA चा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया ही ‘आयकिया’ची जगातील 10 वी सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

रोहीत कसोटीमध्ये प्रथमच करणार नेतृत्व; जाणुन घ्या कधी, कुठे आणि कसे पाहता येणार सामना
रशिया-युक्रेन युद्धाचा इफेक्ट..! फक्त एकाच दिवसात सोन्याचे भाव ‘इतके’ वाढले; जाणून घ्या, सोने-चांदीचे आजचे भाव..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply