Best of luck.. बारावीच्या परीक्षेसाठी मंडळाकडून जोरदार तयारी, खबरदार.. काॅपी कराल तर..
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून (ता. 4) सुरुवात होत आहे. कोरोनानंतर राज्यात प्रथमच बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होत आहे.. या परीक्षेसाठी राज्यात एकूण 14,85,826 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील मुख्य व उपकेंद्रे मिळून एकूण 9635 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.. इंग्रजी विषयाच्या पेपरने या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत असून, 7 एप्रिल रोजी अखेरचा पेपर होणार आहे..
बारावीच्या परीक्षेच्या आयोजनासंदर्भात राज्य बोर्डाकडून तयारी पूर्ण झाली आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन बोर्डाने काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्या आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
बारावीच्या परीक्षेबाबत उपाययोजना
- कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव राहिलेला नाही.. त्यामुळे यंदा 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे, तर 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटे वाढवून देण्यात आली आहे.
- परीक्षेसाठी एका हॉलमध्ये 25 विद्यार्थी हे झिगझॅग (zig zag) पद्धतीने बसणार आहेत.
- विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवला आहे.
- नेहमीपेक्षा सुमारे 15 दिवस उशिराने परीक्षांचा आयोजन
- शाळा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर परीक्षा केंद्र-उपकेंद्र केली आहेत
- 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा होणार आहे.
भरारी पथके नेमली
दरम्यान, बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विशेष महिला भरारी पथके व काही विभागीय मंडळात विशेष मुख्य अधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे..
बाब्बो.. फक्त सात दिवसात रशियाने युक्रेनमध्ये केलाय ‘इतका’ कब्जा; पहा, काय आहे धक्कादायक अहवाल..?
‘त्या’ प्रश्नावर रोहित शर्मा भडकला अन्.. उडवली पत्रकाराची खिल्ली; म्हणाला,यार..