Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BCCI ची ‘कॉन्ट्रॅक्ट लिस्ट’ जाहीर, दिग्गज खेळाडूंना धक्का, नवे खेळाडू मालामाल..

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, अर्थात ‘बीसीसीआय’ने (BCCI) या वर्षाची आपल्या खेळाडूंसाठीची नवी ‘कॉन्ट्रॅक्ट लिस्ट’ जाहीर केलीय. या यादीमध्ये एकूण 27 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यात खेळाडूंची वर्गवारी ‘ए’, ‘बी’, आणि ‘सी’ अशा गटांमध्ये करण्यात आली आहे. ‘बीसीसीआय’च्या नवीन कॉन्ट्रॅक्ट लिस्टनुसार, रोहित शर्मा, विराट कोहली नि जसप्रीत बुमराह ए- प्लस लिस्टमध्ये आहेत. या कॉन्ट्रॅक्टनुसार, या खेळाडूंना प्रत्येक वर्षाला 7 कोटी रूपये मिळणार आहेत.

Advertisement

ए-ग्रेडमध्ये 5 खेळाडू
गेल्या वर्षी ‘बीसीसीआय’च्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये 10 खेळाडूंचा ‘ए’ ग्रेडमध्ये समावेश होता. त्यात आता कपात करुन केवळ 5 जणांनाच ठेवले आहे.. त्यात रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, ऋषभ पंत, लोकेश राहुल आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.. ‘ए’ ग्रेडमधील खेळाडूंना कॉन्ट्रॅक्टनुसार, दरवर्षी 5 कोटी रूपये मिळणार आहेत.

Advertisement

बी-ग्रेडमधील खेळाडू
गेल्या वर्षी ‘ए’ ग्रेडमध्ये असलेले चेतेश्वर पुजारा, अंजिक्य रहाणे व इशांत शर्मा यांना खराब फॉर्ममुळे आता ‘बी’ ग्रेडमध्ये टाकलं आहे. मोहम्मद सिराजने त्याच्या कामगिरीने ‘बी’ ग्रेडमधील आपली जागा कायम ठेवली आहे. नवीन कॉन्ट्रॅक्टनुसार या खेळाडूंना दरवर्षी 3 कोटी रूपये मिळणार आहेत.

Loading...
Advertisement

हार्दिक पंड्याला दणका
गेल्या वर्षी ‘ए’ ग्रेडमध्ये असलेला ऑलराऊंडर हार्दिक पंड्याला या वेळी थेट ‘सी’ ग्रेडमध्ये टाकलं आहे. गेल्या वर्षीपासून हार्दिक दुखापतींनी घेरलेला आहे.. त्यामुळे त्याचा त्याला फटका बसल्याचे दिसते. या ग्रुपममध्ये हार्दिकसोबत शिखर धवनाचाही समावेश आहे.

Advertisement

भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव व वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांना भारतीय बोर्डाने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान मिळालेले नाही. एकप्रकारे त्यांचे पंख छाटण्यात आल्याचे सांगितले जाते..

Advertisement

नव्या कराराची यादी
ग्रेड ए प्लस : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह.
ग्रेड ए : रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद शमी, ऋषभ पंत.
ग्रेड बी : अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा.
ग्रेड सी : शिखर धवन, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, दीपक चाहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मयंक अग्रवाल, सूर्यकुमार यादव, ऋद्धिमान साहा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply