Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

एसटी विलिनीकरणाबाबत समितीचा धक्कादायक निर्णय.. अहवालात काय म्हटलंय, वाचा..!

मुंबई : एसटी महामंडळाचे (ST Corporation) राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत असून, एसटी महामंडळाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. एसटी महामंडळातील 93 हजार कर्मचारी संपावर गेले होते. त्यानंतर राज्य सरकारने पगारवाढीसह कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या.. त्यामुळे काही कर्मचारी कामावर परतले, तर काही कर्मचारी एसटी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

Advertisement

एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने त्रिसदस्यीस समिती गठीत केली होती. या समितीने नुकताच आपला अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे सोपवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी या अहवालाची प्रत मागितली होती. मात्र, राज्य मंत्रीमंडळाची मान्यता असल्याशिवाय हा अहवाल सार्वजनिक करता येणार नसल्याची बाब सरकारी वकिलांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली..

Advertisement

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा अहवाल मांडण्यात आला असून, सूत्रांकडून अहवालाची माहिती मिळाली.. त्यानुसार, ‘एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरण करता येणार नसल्याचे त्रिसदस्यीय समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे..

Loading...
Advertisement

राज्य एसटी महामंडळातील 93 हजार एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरण करणे व्यावहारिक नाही. त्यामुळे हे विलीनीकरण करता येणार नसल्याची बाब अहवालात नमूद करण्यात आली आहे.. गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. या कर्मचाऱ्यांच्या सगळ्या आशा समितीच्या निर्णयावर लागल्या होत्या. मात्र, आता समितीनेही विलीनीकरण करता येणार नसल्याचा अहवाल दिल्याने एसटी कर्मचाऱ्यांसमोरील पेच आणखी वाढला आहे.. एसटी विलीनीकरणाचा त्यांच्यासाठीचा कायदेशीर मार्गही आता बंद झाला आहे..

Advertisement

पाकिस्तानला मोठा झटका; पहा बॉम्बस्फोटात कोण आणि कितीजण झालेत ठार व जखमी
संकटात संकट..! युरोपातील ‘त्या’ 19 देशांवर आलेय ‘हे’ मोठे संकट; श्रीमंत देशही होताहेत हैराण..

Advertisement
Advertisement

Leave a Reply