मुंबई : रशिया व युक्रेन युद्धाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसत आहे.. या युद्धामुळे गुंतवणुकदार धास्तावले असून, शेअर विक्रीचा धडाका सुरु आहे.. गेल्या 7 दिवसांपासून रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम केवळ भारतीय शेअर बाजारावरच नव्हे तर संपूर्ण अशिया खंडातील शेअर बाजारावर झाल्याचे पहायला मिळत आहे. युद्धाचे पडसाद आजही (बुधवारी) शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळाले.. सकाळचे सत्रच घसरणीने सुरु झाले.. पहिल्याच सत्रामध्ये तब्बल 900 अंकांनी बाजार कोसळला. निफ्टीही 16,600 अंकाच्या खाली आला.
पहिल्या सत्रात काही वेळ बँकिंग, ऑटो आणि फार्मा क्षेत्रात तेजी दिसली, मात्र नंतर शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स (Sensex) 900 अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.. हेवीवेट, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स आणि इन्फोसिसचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरले.. त्याच वेळी टाटा स्टील, एम अँड एम, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी दिसली.
बुधवारी दिवसभर शेअर बाजारात घसरणीची स्थिती कायम होती. बाजार बंद होताना, सेन्सेक्स 778 अंकांनी कोसळून 55,468.90 अंकावर बंद झाला. बीएसई मिडकॅप निर्देशांक 39 अंकांनी घसरून 23,316.56 अंकावर स्थिरावला. बीएसई स्मॉल कॅप 31 अंकांनी घसरला नि दिवस अखेर 26,631.33 अंकावर राहिला. निफ्टी-50 निर्देशांक 165 अंकांनी घसरुन 16,628.80 अंकावर बंद झाला. बँक निफ्टी 740 अंकांनी खाली येऊन त्याचा शेवट 35,465.20 वर झाला.
कच्चे तेल प्रति बॅरल 110 डॉलरवर
रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा फटका हा कच्च्या तेलाच्या किमतींना बसत आहे. बुधवारी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तब्बल 4.67 टक्के वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. 4.67 टक्क्यांच्या दर वाढीसह कच्चे तेल 110 डॉलरवर प्रति बॅरलवर पोहोचले. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने भविष्यात महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे..
कसोटी मालिकेपूर्वी ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने; पाकिस्तानबद्दल दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाला..
अन्.. IPL वर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या; ‘त्या’ माजी खेळाडूंना अश्विन ने दाखवला आरशा