Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बंगालमध्ये भाजपला पुन्हा जोरदार झटका..! सत्ताधारी तृणमूलने मिळवला शानदार विजय; पहा, किती नगरपालिका जिंकल्या..?

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून दहा महिन्यांनंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने बुधवारी राज्यातील 107 नगरपालिकांपैकी 93 नगरपालिकांमध्ये विरोधकांचा दणदणीत पराभव केला. राज्य निवडणूक आयोगाच्या (SEC) अधिकाऱ्याने ही माहिती दिली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि नंदीग्रामचे आमदार शुभेंदू अधिकारी यांचा ‘गड’ समजल्या जाणाऱ्या कांथी नगरपालिकेत तृणमूल काँग्रेसने बाजी मारली आहे, तर उत्तर बंगालच्या राजकारणात नवोदित असलेल्या हमरो पार्टी पक्षाने तृणमूल काँग्रेस, गोरखा जनमुक्ती मोर्चा आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव करून दार्जिलिंग नगरपालिका काबीज केली आहे.

Advertisement

नादिया जिल्ह्यातील ताहेरपूर नगरपालिकेत माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने विजय मिळवला आहे. भाजप आणि काँग्रेसने आतापर्यंत एकही महापालिका जिंकली नसली तरी काही शहरातील काही प्रभागांमध्ये हे पक्ष आघाडीवर आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “तृणमूलने आधीच 93 नगरपालिकांमध्ये विजय नोंदवला आहे तर इतर सात नगरपालिकांमध्ये आघाडीवर आहे. डावी आघाडी आणि हमरो पक्षाने प्रत्येकी एका गटात विजय नोंदवला आहे. किमान चार पालिका अशा आहेत की जिथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे येथून विजयी झालेल्या अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

Advertisement

गेल्या चार दशकांपासून अधिकारी कुटुंबाचा ‘गड’ मानल्या जाणाऱ्या कांथी नगरपालिकेत तृणमूल काँग्रेसने विजय मिळवल्याने या निवडणुकीत भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांना मोठा धक्का बसला आहे. या नगरपालिकांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे भाजपने या विरोधात सोमवारी 12 तासांचा बंद पुकारला होता. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले. तृणमूलने म्हटले की, पराभवाची जाणीव झाल्यानंतर विरोधी पक्ष निमित्त शोधत आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशातील 5 राज्यातील विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांचे निकाल येत्या 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत. त्याआधीच भाजपसाठी धक्का देणारी ही बातमी आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून भाजपला येथे सातत्याने धक्के बसत आहेत. निवडणुकीआधी पक्षात आलेल्या अनेक जणांनी पक्ष सोडला आहे. आणखीही काही जण पक्ष सोडण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत पक्ष आधिक कमकुवत होत चालला आहे. पश्चिम बंगालमधील महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हे दिसून आले आहे.

Advertisement

बंगालमध्ये भाजपला आणखी एक झटका..! ‘त्या’ समस्येला रोखण्यात भाजप ठरतोय अपयशी; पहा, आता काय घडलेय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply