युक्रेनला वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थी का जातात..? वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडून मोठा निर्णय जाहीर…
औरंगाबाद : रशिया व युक्रेनमधील वादामुळे भारतातील हजारो विद्यार्थ्यांना परत आणले जात आहे. मात्र, यानिमित्ताने देशातील इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.. भारतातून तब्बल 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्याचे समोर आले आहे.. त्यानंतर युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण (Medical Education) भारताच्या तुलनेत अत्यंत स्वस्त व दर्जेदार असल्याची बाब समोर आली. त्यामुळे आता युक्रेनमधील स्वस्त नि दर्जेदार ‘एमबीबीएस’ (MBBS)च्या पॅटर्नचा अभ्यास करुन त्यानुसार येथे बदल केला जाणार असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की रशिया-युक्रेनमधील वादामुळे राज्यातील हजारो तरुण युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्याचे समोर आले. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी जात असतील, याची कल्पनाच नव्हती. युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण स्वस्त असल्याचे समोर आलेय. तेथील शुल्क रचना नि राज्यातील शुल्क रचनेबाबत माहिती घेतली जाईल. तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्क रचना करण्यासाठी राज्यात सेवानिवृत्त न्यायाधीश हे प्रमुख असतात. सध्या शुल्क रचनेला कायद्याचा आधार आहे, पण युक्रेनमधील वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांची आवश्यक ती नोंद राज्य सरकारने घेतली आहे. त्याबाबतचा अहवाल तयार झाल्यानंतरच त्यावर बोलता येईल, असे ते म्हणाले..
दरम्यान, युक्रेनमधील ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमाचे शुल्क भारतातील शुल्कापेक्षा खूपच कमी आहे. भारतात खासगी महाविद्यालयात हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 1 कोटीपर्यंत खर्च येतो. अमेरिकेत 8 कोटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडातदेखील हा खर्च 4 कोटी रुपयांपर्यंत जातो. मात्र, युक्रेनमध्ये ‘एमबीबीएस’ची डिग्री फक्त 25 लाखांत होते.. प्रात्यक्षिकांवर आधारीत शिक्षण पद्धतीमुळे येथील शिक्षणाचा दर्जाही उत्कृष्ट असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच दरवर्षी भारतासह अनेक देशांचे विद्यार्थी युक्रेनला वैद्यकीय शिक्षणासाठी जात असल्याचे समोर आले आहे. त्याचा अभ्यास केला जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले..
आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट, ‘एसआयटी’च्या अहवालात धक्कादायक बाबी उघड..
तीन कंपन्यांचे महिनाभर चालणारे प्लान.. एक दिवसाचा खर्च फक्त 4.7 रुपये.. पहा, किती मिळतोय डेटा..