मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान काही महिन्यांपूर्वी ‘ड्रग्ज’ बाळगल्याप्रकरणी अडचणीत आला होता. अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) 3 ऑक्टोबर 2021 रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारी केली हाेती. त्यावेळी तेथे आर्यन खान याच्यासह मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट यांना अटक करण्यात आली. तर उर्वरित पाच आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक केली होती. या प्रकरणात आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभर गाजलं.. त्यानंतर एनसीबीच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे..
कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनसीबीने (NCB) स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यनकडे त्यावेळी कोणतेही ड्रग्ज नसल्याचा निष्कर्ष या समितीने तपासाअंती दिला आहे. तसंच आर्यन खानचे कोणत्याही ड्रग रॅकेटशीही संबंध असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचेही ‘एनसीबी’च्या एसआयटीचं (NCB SIT) म्हणणं आहे.
दरम्यान, मोठ्या न्यायालयीन लढाईनंतर आर्यनला जामीन मिळाला, मात्र आता ‘एनसीबी’च्या ‘एसआयटी’चा अहवाल आर्यनच्या बाजूने आल्याने त्याला मोठा दिलासा मिळाल्याचे बोलंलं जात आहे. ‘एसआयटी’च्या अहवालानंतर ‘एनसीबी’चे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे..
आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलेच नाहीत, तर मग त्याचा फोन ताब्यात घेऊन ‘चॅटस’ का तपासण्यात आले, असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच कॉर्डिलिया क्रुझवर धाड घातली, तेव्हा ‘एनसीबी’च्या नियमांप्रमाणे त्याचे व्हीडिओ चित्रीकरण केलेले नसल्याचेही ‘एसआयटी’च्या अहवालात नमूद केले आहे. गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले असल्याचे ‘एसआयटी’ने म्हटले आहे..
टेस्टी अन् हेल्दी नाश्ता हवाय; मग, या 3 साऊथ इंडियन डिश तयार कराच; रेसिपीही आहे अगदी सोपी..
आहात ना तयार..! पेट्रोलची होणार 15 रुपये वाढ..! पहा नेमके काय असेल कारण