Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

धन की बात..! ‘एलआयसी आयपीओ’मध्ये सूट हवीय, मग लगेच करा हे काम..!

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये एका गोष्टीची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे ‘एलआयसी आयपीओ’ची… या महिन्यात ‘एलआयसी आयपीओ’ शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे.. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये काही भाग ‘एलआयसी’च्या पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून, त्यांना स्वस्तात शेअर्स दिले जाणार असल्याचे बोलले जाते. मात्र, त्यासाठी पॉलिसीधारकांना दोन महत्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत..

Advertisement

‘एलआयसी आयपीओ’ घेण्यासाठी पाॅलिसीधारकांना त्यांचे पॅन कार्ड पॉलिसीसोबत लिंक करावे लागणार आहे. तसेच ‘डिमॅट खाते’ असणारे पॉलिसीधारकच ‘आयपीओ’साठी अर्ज करू शकतात. ‘एलआयसी’ त्यांच्या पॉलिसीधारकांसाठी ‘आयपीओ’मध्ये पाच टक्क्यांपर्यंत सूट देऊ शकते. आयपीओमधील पाच टक्के कर्मचार्‍यांसाठी, तर 10 टक्के पॉलिसीधारकांसाठी राखीव कोटा ठेवला जाणार आहे. ‘एलआयसी’च्या 26 कोटी पॉलिसीधारकांसाठी 3.16 कोटी शेअर्स राखीव ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते..

Advertisement

दरम्यान, पाल्यांच्या नावे काढलेल्या ‘एलआयसी पॉलिसी’वरही पालकांना सवलतीत ‘आयपीओ’ घेता येणार आहे.. एकूण 35 टक्के ‘आयपीओ’ एलआयसीच्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आहेत. म्हणजेच, पॉलिसीधारक जास्तीत जास्त 4 लाख रुपयांपर्यंत शेअर्ससाठी बोली लावू शकतो. दोन्ही अर्ज एकाच डिमॅट खात्यातून केले, तरी ते वैध मानले जाणार आहेत. पॉलिसीधारकांसाठी कोणताही लॉकइन कालावधी नसेल आणि ते लिस्टींगच्या दिवशीही शेअर्स विकू शकतात.

Loading...
Advertisement

पॉलिसीधारकांचे स्वतःच्या नावावर डीमॅट खाते असावे. तसेच, त्याने 28 फेब्रुवारीपर्यंत त्याच्या पॉलिसी रेकॉर्डमध्ये पॅन नंबर अपडेट केलेला असणे आवश्यक आहे. पॉलिसी 13 फेब्रुवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी जारी केलेली असावी. नॉमिनी आणि मृत पॉलिसीधारकाचा लाभ घेणारा जोडीदारास मात्र या सवलतीसाठी अर्ज करता येणार नाही.

Advertisement

Goat Farming Info : ‘या’ आहेत शेळ्यांच्या उपयुक्त जाती; वाचा मार्केट ट्रेंडविषयी महत्वाची माहिती
Mahashivratri special : उपवासात मसालेदार पदार्थ खायचाय का? बनवा या सोप्या रेसिपीने फलाहारी टिक्की

Advertisement
Advertisement

Leave a Reply