Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युक्रेनला भारताकडून मदतीचा हात..! उच्चस्तरीय बैठकीत नेमकं काय ठरलं..?

नवी दिल्ली : रशिया व युक्रेनमधील वाद काही केल्या संपताना दिसत नाही. गेल्या 5 दिवसांत रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, हजारो लोक पूर्व युरोपीय देशांच्या सीमा भागाकडे निघाले आहेत. त्यामुळे तेथेही मानवी संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी मानवतावादी दृष्टीकोनातून भारताकडे मदतीसाठी हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत भारताने युक्रेनला मदत सामग्री पाठवण्याचा निर्णय घेतला आहे..

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली परराष्ट्र मंत्रालयात नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत मंगळवारी (ता. 1 मार्च) युक्रेनला मदत सामग्री पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती म्हणाले, की ‘युक्रेनमधील मानवतावादी गरजा लक्षात घेऊन भारत सरकारने औषधांसह तत्काळ मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी ही मदत युक्रेनला पाठवण्यात येईल. युक्रेनमधील घडामोडींबद्दल भारत चिंतेत आहे. हिंसाचार तात्काळ संपवण्याची आमची मागणी आहे. युक्रेनच्या सीमेवरील मानवी संकटाचा सामना करण्यासाठी मदत सामग्रीची पहिली खेप मंगळवारी पाठवली जाणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मंगळवारी पहाटे 5.30 वाजता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून ‘ऑपरेशन गंगा’चे नववे उड्डाण दिल्लीला रवाना झाल्याची माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की भारतीयांच्या सुरक्षेची खात्री होईपर्यंत प्रयत्न सुरूच राहतील. ऑपरेशन गंगामधील नववे विमान 218 भारतीय नागरिकांसह बुखारेस्ट येथून नवी दिल्लीला रवाना झाले आहे.

Advertisement

Poultry Farming Info: म्हणून पोल्ट्रीमध्ये आहे मोठा स्कोप; वाचा महत्वाची माहिती
Mahashivratri special : उपवासात मसालेदार पदार्थ खायचाय का? बनवा या सोप्या रेसिपीने फलाहारी टिक्की

Advertisement
Advertisement

Leave a Reply