Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खासदार संभाजीराजे यांचे उपोषण मागे, राज्य सरकारकडून ‘या’ मागण्या मान्य…

मुंबई : मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhaji chhatrapati) उपोषण करीत होते. अखेर ठाकरे सरकारने सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

Advertisement

दरम्यान, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजीराजे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली.. त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिले.. तसेच मंत्री शिंदे यांनी मान्य करण्यात आलेल्या मागण्या सर्वांना वाचून दाखवल्या. संभाजीराजे यांनी केवळ 7 मागण्या केल्या होत्या, आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्याही पूर्ण केल्या आहेत. काहीच ठेवायचं नाही, असा निर्णय सरकारने घेतला असून, या सर्व मागण्या मान्य करीत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.. त्यानंतर संभाजीराजे यांनी लहान मुलीच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले.

Advertisement

गेली 3 दिवसांपासून संभाजीराजे उपोषण करीत होते. त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला होता. सरकारने त्यांना चर्चेचे निमंत्रण दिलं होतं. मात्र, राजेंनी चर्चेला जाण्यास नकार दिला. त्यांनी आपल्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाठवलं. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी आझाद मैदानात जाऊन सरकारने दिलेले लेखी आश्वासन वाचून दाखवलं व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार संभाजी राजे यांनी उपोषण सोडलं. संभाजीराजे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनीही तीन दिवस उपोषण केले. संभाजीराजे यांनी त्यांना ज्यूस देऊन त्यांचेही उपोषण सोडलं.

Loading...
Advertisement

या मागण्या मान्य

Advertisement
  1. सारथीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरू करण्यात येईल. सारथीच व्हीजन डॉक्युमेंट 30 जूनपर्यंत ठेवलं जाईल. सारथीतील पदं ही 30 जूनपर्यंत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सारथीच्या उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव 15 मार्च पर्यंत ठेवला जाईल.
  2. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 100 कोटी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतलाय. कर्जाची मुदत ही 10 लाख रुपये होती ती 15 लाख रुपये केलीये. 15 मार्चपर्यंत संचालक मंडळांची नियुक्ती केली जाईल.
  3. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून यादी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसतिगृह सुरू करण्यात येईल.
  4. कोपर्डीतील घटनेतील केस महाधिवक्त्यांकडून मेंशन करण्यात येईल म्हणजे ही केस बोर्डावर आणली जाईल.
  5. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला बैठक घेण्यात येईल. तसेच या आंदोलनात ज्यांचा सहभाग नव्हता त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातील. सीसीटीव्ही फुटेज पाहून हा निर्णय घेतला जाईल.
  6. मराठा आंदोलनात मृत पावलेल्या 18 जणांना नोकऱ्या मिळाल्यात. इतरांना ताबडतोब नोकरी देण्याचा निर्णय घेतला.
  7. स्थिगितीपूर्वी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवडीचा पर्याय देऊन अधिसंख्येची पदं निर्माण करून त्या भरण्याची संभाजी राजेंची मागणी होती. याबाबत एका महिन्यात मंत्रीमंडळासमोर हा प्रस्ताव ठेवला जाईल.

‘त्या’ खेळाडूला 3 वेळा बोल्ड केल्यानंतर IPL मध्ये मिळाली संधी; बुमराहने शेअर केला ‘तो’ किस्सा
भारतीय शेअर बाजाराला युद्धाचे चटके.. आठवड्याची सुरुवातही घसरणीने…

Advertisement
Advertisement

Leave a Reply