Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारतीय शेअर बाजाराला युद्धाचे चटके.. आठवड्याची सुरुवातही घसरणीने…

मुंबई :  रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर साऱ्या जगावर जागतिक महायुद्धाचे सावट पसरले आहे. या युद्धाचे चटके जगभरातील भांडवली बाजाराला बसत आहेत. त्यातून भारतीय शेअर बाजारही सुटलेला नाही.. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने गुंतवणुकदारांचे 10 लाख कोटींचे नुकसान झाले होते.. मात्र, आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी (ता. 25) शेअर बाजारात पुन्हा तेजी आली होती. त्यामुळे या आठवड्यात परिस्थिती कशी असेल, याकडे गुंतवणुदारांचे लक्ष लागले होते.. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांची निराशा झाली..

Advertisement

भाडंवली बाजारात आज (सोमवारी) मोठी पडझड झाली. रशियाने अणुयुद्धाची तयारी सुरु केल्याचे समजताच गुंतवणूकदारांची गाळण उडाली. आज सकाळी बाजार खुला होताच, सेन्सेक्समध्ये 700 अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 250 अंकाची घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे जवळपास दोन लाख कोटींचे नुकसान झालेय.

Advertisement

सेन्सेक्सवरील 30 पैकी 28 शेअर कोसळले. आयटी सेवा, वाहन उद्योग, एफएमसीजी, बँक, वित्तीय सेवांमधील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. टायटन, इन्फोसिस, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, मारुती, एल अँड टी, बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, एशियन पेंट, रिलायन्स, एसबीआय शेअरमध्ये मोठी पडझड झाली. निफ्टी मंचावर निफ्टी मेटल वगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. वोडाफोन, सेल , नाल्को शेअरमध्ये वाढ झाली.

Loading...
Advertisement

फ्युचर ग्रुपच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली. फ्युचर रिटेल, फ्युचर लाईफ स्टाईल, फ्युचर कन्झुमर शेअरमध्ये 8 ते 10 टक्के वाढ झाली. सध्या सेन्सेक्स 55,189 अंकावर असून, त्यात 668 अंकांची घसरण झाली. निफ्टी 180 अंकांच्या घसरणीसह १६४७७ अंकांवर आहे.

Advertisement

रशिया व युक्रेनमधील युद्धाचा घटनाक्रम या आठवड्यातील शेअर बाजाराची दिशा ठरवेल. मागील आठवड्यात रशियाने यूक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगातील शेअर बाजारामध्ये घसरण दिसली होती. या आठवड्यामध्ये रशिया-यूक्रेनच्या युद्धासंबधी घटनाक्रमांशिवाय लक्षणीय मायक्रो इकोनॉमिक डेटा बाजाराची दिशा ठरवणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे..

Advertisement

काम की बात : शेअर बाजारातील अस्थिरतेचा अशा प्रकारे घ्या फायदा.. काही काळाने व्हा मालामाल
सोन्याच्या किंमतीबाबत तज्ज्ञांनी व्यक्त केलाय ‘हा’ अंदाज; पहा, सोन्याचे भाव घटणार की वाढणार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply